♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आ.ॲड.फुंडकरांच्या मागणीची केंद्रीय आरोग्य़ मंत्री भारतीताई यांच्या कडून दखल खामगांव शहरात सुरु होणार आणखी तीन नवीन शहरी आरोग्य़ सुविधा केंद्र

MH 28 News Live, खामगांव : भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या मागणीची केंद्रीय आरोग्य़ राज्य़ मंत्री ना. डॉ. भारती पवार यांची तातडीने दखल घेत खामगांव शहरात आणखी तीन नवीन शहरी आरोग्य़ सुविधा केंद्रांना आरोग्य़ विभागाने मंजूरात दिली आहे.

केंद्रीय आरोग्य़ राज्य़मंत्री ना. डॉ. भारतीताई पवार ह्या दि. 22 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आल्या असता भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी त्यांची भेट घेऊन खामगांव शहर व ग्रामीण भागातील आरोग्य़ सुविधा उत्तम़ देता याव्या यासाठी विविध समस्या व आवश्यक़ आरोग्य़ सेवा, इत्यादीबाबत सकारात्म़क चर्चा झाली त्याला प्रतिसाद देत मा.मंत्री महोदयांनी खामगांव शहराची आरोग्य़ सुविधा विषयी मागण्या पुर्ण करुन असे ठोस आश्वासन आ.ॲड.फुंडकरांना दिले होते.

उपरोक्त़ मागण्यापैकी एक महत्वाची मागणी मा.मंत्री भारतीताई पवार यांनी केवळ पाचच दिवसात मंजूर केली असून त्याबाबतचे आदेश संबंधीतांना दिले असून खामगांव शहरात आरोग्य़ सेवा अधिक उत्त़म व्हावी यासाठी आणखी तीन नवीन शहरी आरोग्य़ सुविधा केंद्रांना मंजूरात दिली आहे. सद्या शहरात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अतंर्गत न.प.दवाखाना टॉवर चौक व न.प.शाळा क्र. 2 येथे शहरी आरोग्य़ सुविधा केंद्र कार्यरत आहेत. आता राष्ट्रीय शहरी आरोग्य़ अभियान अंतर्गत 15 वित्त़ आयोगांतर्गत नवीन तीन शहरी नागरी आरोग्य़ सुविधा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. खामगांव शहरातील शहरी नागरी सुविधेत सुधारणा होणार आहे.

बुलडाणा येथे आरोग्य़ मंत्री यांच्या सोबत झालेल्या चर्चे दरम्यान आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी खामगांव मतदार संघातील विविध आरोग्य़ सुविधा व त्यासाठी आवश्यक़ पायाभूत सुविधांची मागणी केली यात, उपजिल्हा रुग्णालय खामगांव येथे नवीन 20 कर्मचारी निवासस्थान बांधकाम करणे, उपजिल्हा रुग्णालय खामगांव येथील रक्तपेढीचे नुतनीकरण करणे, उपजिल्हा रुग्णालय खामगांव येथे वैद्यकीय अधिक्षक कार्यालय बांधकाम करणे, प्रा.आ.केंद्र पिंपळगांव राजा ता.खामगांव येथे नवीन 14 कर्मचारी निवासस्थान बांधकाम करणे, प्रा.आ.केंद्र रोहणा ता.खामगांव येथे नवीन 8 कर्मचारी निवासस्थान बांधकाम करणे, प्रा.आ.केंद्र अटाळी ता.खामगांव येथे नवीन 14 कर्मचारी निवासस्थान बांधकाम करणे, प्रा.आ.केंद्र बोथाकाजी ता.खामगांव येथे नवीन 2 वैद्यकीय अधिकारी निवासस्थान बांधकाम करणे या मागणीचा समावेश असून याबाबत आमदार ॲड आकाश फुंडकरांची मा.मंत्री महोदयांशी सकारात्मक़ चर्चा झाली आहे. याही मागण्या लवकरच मंजूर होऊन खामगांव मतदार संघातील सर्व साधारण गेार गरीब, शेतकरी जनतेला चांगली आरोग्य़ सुविधा देण्यासाठी आमदार ॲड आकाश फुंडकर प्रयत्ऩरत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129