श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त चिखलीत शोभायात्रेचे आयोजन
MH 28 News Live, चिखली : राजराजेश्वर भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्यावतीने चिखली शहरांमध्ये मंगळवार, दि. ३ मे रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेमध्ये सर्वशाखीय, बहुभाषिक ब्राह्मण समाजातील बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने निघणारी ही शोभायात्रा श्री राम मंदिर रामदासी ( आदर्श विद्यालय जवळ ) येथून सायंकाळी ५ वाजता प्रारंभ होईल. जुने गाव श्री गणपती मंदिर मार्गे चिंच परिसर, सिमेंट रोड, जयस्तंभ चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, तेथून पुन्हा जयस्तंभ चौक व राजा टाँवर परिसर यामार्गे वाजत गाजत ही शोभायात्रा श्री रेणुकादेवी मंदिरामध्ये पोहोचेल. तेथे सामूहिक महाआरतीद्वारे या शोभायात्रेचा समारोप करण्यात येईल. तत्पूर्वी पहाटे ५ वाजता भगवान श्री परशुराम यांच्या मूर्तीला श्री रेणुकादेवी मंदिरामध्ये महाभिषेक देखील करण्यात येणार आहे. या सर्व आयोजनामध्ये चिखली शहरातील सर्वशाखीय, बहुभाषिक ब्राह्मण बंधू-भगिनींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button