
माजी आमदार राहुल बोंद्रेंच्या वाढदिवशी जयपूर फुट जोडणी व अस्थिव्यंग तपासणी शिबीर
MH 28 News Live, चिखली : बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त 8 मे रोजी अनुराधा मिशन व साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अपंग जयपूर फुट जोडणी व अस्थिव्यंग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या रूग्णसेवा हिच ईश्वर सेवा या ब्रिद वाक्याला सार्थ ठरवीत अपंग सेवा महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या अस्थिव्यंग तपासणी व फुट ( हात/पाय) जोडणी षिबीराचा जिल्हायासह परीसरातील गरजु रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन अनुराधा मिशनच्या वतीने डॉ.कैलाश बियाणी यांनी केले आहे.
माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिनांक 08 मे 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत या शिबीराचे आयोजन महाराणा प्रताप इनडोअर स्टेडीअम, साकेगांव रोड, अनुराधा नगर, चिखली येथे करण्यात आले आहे. या जयपुर फुट जोडणी तथा अस्थिव्यंग तपासणी शिबीराचा लाभ घेण्याकरीता निशुल्क नोंदणी साठी 7744805581, 8378884679, 9420461991, 9011495936, 8007074935, 7350773976 या क्रमांकांवर संपर्क साधुन पुर्व नोंदणी करणे गरजे आहे. या हातपाय जोडणी शिबीराचा जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन अनुराधा मिशन चिखली व साूध वासवानी मिशन पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button