♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पिंपळगाव काळे येथील 26 वर्षीय तरुणाचा कुर्‍हाडीने वार करून खून. चार आरोपींना अटक

MH 28 News Live, जळगांव जामोद : जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतमध्ये येत असलेल्या पिंपळगाव काळे येथील शिव नगरामधील 26 वर्षीय तरुणाच्या अंगावर व पाठीवर कुर्‍हाडीने वार केल्यामुळे गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दि. ३ मे रोजी घडली आहे याबाबत मयत युवकाचा भाऊ अजय किसन राऊत याने जळगाव जामोद पोलीस स्टेशन फिर्याद दिली. पिंपळगाव काळे येथील सुपेश किसन राऊत वय 26 वर्षे हा त्याच्या परिवारासह शिवनगरमध्ये राहत होता. आरोपीने सुपेश सोबत ‘ तू शेतात जाता – येता आमच्या घराकडे का पाहतो ” या कारणावरून दिनांक 3 मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वाद घातला. असता आरोपी किसन रमेश वरणकार, गणेश किसन वरणकार, अजय किसन वरणकार व हरिदास रमेश वरणकार यांनी संगनमत करून सुपेश याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली नंतर कुर्‍हाडीने पाठीवर व डोक्यावर वार करीत त्याला गंभीर जखमी केले होते. तश्या अवस्थेत सुपेशला जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सुपेश याच्यावर उपचार चालू असतानाच तो गंभीर जखमी असल्याकारणाने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी फिर्याद जळगाव जामोद पोलीस स्टेशनला देण्यात आली. जळगाव जामोद पोलिसांनी अपराध नंबर 250/2022 कलम 302 नुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करीत घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला व त्यामधील तीन आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर त्यापैकी एक आरोपी घटनेमध्ये जखमी झाला असता त्याला उपचारार्थ भरती करण्यात आले असून पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास चौधरी हे करीत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129