♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मंदिराचे बांधकाम करण्यासाठी आलेल्या मजूराचा गांगलगावात खून, चिखली तालुक्यातील घटना

MH 28 News Live, चिखली : अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिखली तालुक्यातील गांगलगाव येथे आज, १० मे रोजी एका बांधकाम मजुराचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गांगलगाव येथे एका मंदिराचे बांधकाम सुरू होते. या कामावर गेल्या चार दिवसांपासून आलेल्या एका युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. शिवाजी बोबडे ( अंदाजे वय ३५) असे मृतकाचे नाव सांगण्यात येत आहे. मात्र तो कुठला आहे याबद्दल अजून स्पष्टता नाही.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गांगलगाव येथे एका मंदिराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर चिखली येथील रईस काम करीत होता. ४ दिवसांपूर्वी रईसने चिखली येथील बसस्टँडवरून एका युवकाला काम देतो असे सांगून गांगलगावला आणले होते. दोघेही चार दिवसांपासून मंदिर परिसरात राहत होते. रईस आधीपासून गावात कामाला असल्याने गावातील एका दुकानात त्याचे उधारीचे खाते होते.

रईसने सोबत आणलेल्या युवकाला सुद्धा उधरीत पुड्या घेऊन दिल्या होत्या. त्यावेळी त्या युवकाने त्याचे नाव शिवाजी बोबडे असे सांगितले होते. दरम्यान काल, ९ मे रोजी काम बंद होते. आज,१० मे रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास मंदिरामागच्या शेतात काहीतरी पेटलेले स्थानिकांना दिसले. स्थानिकांनी धाव घेत आग विझवली असता आगीत एका युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसून आला.

घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या प्रकाराची चर्चा गावात पसरल्यानंतर तो मृतदेह शिवाजी बोबडे नावाच्या युवकाचा असल्याचे समोर आले. दरम्यान हा खून असल्याचा संशय पोलसांना असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले..संशयीत म्हणून पोलीसांनी सध्या रईसला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे. अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांत हा दुसरा खून आहे. याआधी असोला फाट्यावर एका ट्रकचालकाचा अज्ञातांनी खून केला होता. त्या प्रकरणाचा उलगडा झालेला नसतांना आणखी एक खून झाल्याने पोलीसांवरील ताण वाढणार आहे

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129