चिखली अर्बन विद्यानिकेतनमध्ये टागोर जयंती व स्व. भगवानदासजी गुप्त यांचा २७ वा स्मृतिदिन साजरा
MH 28 News Live, चिखली : चिखली शहरातील अग्रगण्य व अल्पावधीतच नावारुपाला आलेली दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन सीबीएसई स्कूल मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व प्रांतसंघचालक व चिखली अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय जनसंघाच्या स्थापनेच्या वेळेचे संस्थापक, निमंत्रक तथा मध्यभारत व वऱ्हाड प्रांताचे (सी.पी.अँड बेरार) महामंत्री अनेक नागरी सहकारी बँका आणि शिक्षण संस्था यांच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान देणारे स्व. भगवानदासजी गुप्त उपाख्य लालाजी यांचा आज २७ वा स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अतिशय प्रतिकूल आणि संकटाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा उत्तुंग कार्य करण्याची शिकवण लालजींनी आपल्या स्वतःच्या जीवनातून दिली. आज कोरोनाच्या भीषण परिस्थितीमध्ये स्व. लालाजींच्या संयमी व खंबीर व्यक्तिमत्वाची आठवण प्रकर्षाने होत आहे. याप्रसंगी लालाजींच्या शिकवणीतून आपण आजच्या विपरीत व कठीण परिस्थितीवर संयम व सेवाभावाच्या मार्गाने मात करण्याचा संकल्प करून स्व.भगवानदासजी गुप्त उपाख्य लालाजी यांना कृतीरूप विनम्र अभिवादन करण्यात आले. भारताच्या राष्ट्रगीताची रचना करणारे तसेच नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शाळेच्या शैक्षणिक संचालीका डॉ. पूजा गुप्ता, शाळेचे प्राचार्य गौरव शेटे, तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दि चिखली अर्बन विद्यानिकेतन सीबीएसई स्कूल येथे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दिनांक ०२ मे २०२२ ते १६ मे २०२२ या कालावधीत “कौशल्य उन्हाळी शिबीर” आयोजित केलेले आहे. सदर शिबिरामध्ये योगा, कराटे, लाठीकाठी, स्विमिंग, रांगोळी, चित्रकला अशा विविध कलागुणांना वाव देण्यात येत आहे. तसेच त्याचबरोबर वाहतुकीचे नियम व कायदे, प्रथमोपचार, बँकिंग प्रणाली, भारतीय मुख्य पिके अशा अनेक विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त मनोरंजनाचे कार्यक्रम, बोथा अभयारण्य भेट, बँक, पोस्ट, पोलीस स्टेशन भेट घेऊन माहिती देण्यात येणार आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button