कंत्राटी कला व संगणक शिक्षक पदांकरीता 29 मे रोजी होणार लेखी परीक्षा
MH 28 News Live, बुलडाणा : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या अधिनस्थ शासकीय आश्रम शाळांवर कला व संगणक शिक्षक या कंत्राटी पदांकरीता 24 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2019 दरम्यान अर्ज मागविण्यात आले. प्राप्त झलेल्या अर्जांनुसार कंत्राटी कला शिक्षक पदासाठी 144 व पदवीधर अंशकालीनचे 5 असे एकूण 149 अर्ज प्राप्त झाले. तसेच संगणक शिक्षक पदासाठी 114 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले. तरी या पदांसाठी लेखी परीक्षेचे आयोजन 29 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिव्हील लाईन रोड, अकोला येथे करण्यात आले आहे. परीक्षेकरीता 100 प्रश्न असणार आहे. प्रती प्रश्न 2 गुणाप्रमाणे एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा राहील. यामध्ये कला शिक्षक पदाचे परीक्षेकरीता सामान्य ज्ञानचे 70 व आर्ट टिच डिप्लोमा अर्हतेवर आधारीत 30 प्रश्न राहतील. संगणक शिक्षक पदासाठी सामान्य ज्ञान 70 व संगणक अर्हतेवर 30 प्रश्न असणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांनी आवेदन पत्रात नमूद केलेल्या पत्त्यावर रजिष्टर पोस्टाने पाठविण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना 24 मे 2022 पर्यंत प्रवेशपत्र प्राप्त होणार नाहीत, त्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसूल भवन इमारत, माहेश्वरी भवन जवळ, न्यु राधाकिसन प्लॉट, अकोला येथील कार्यालयातून 25 व 26 मे रोजी कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button