![](https://mh28newslive.com/r3e/uploads/2022/05/thebridgechronicle_import_s3fs_public_news_story_cover_images_0RTE_83.jpg)
शैक्षणिक वर्ष 2022- 23 ची आरटीई 25 टक्के प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया सुरू. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेशाला उद्यापासून प्रारंभ
MH 28 News Live, बुलडाणा : जिल्हयातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम- 2009 नुसार दरवर्षी प्रमाणे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार 2022-23 या वर्षांच्या आरटीई 25 टक्के प्रक्रियेच्या प्रवेशाची सोडत (लॉटरी) 30 मार्च 2022 रोजी राज्यस्तरावरुन काढण्यात आलेली आहे.
निवड यादीतील बालकांचे प्रवेश शाळेत जावून घेण्याची मुदत 10 मे 2022 पर्यंत देण्यात आलेली होती. तसेच या प्रवेश प्रक्रियेनुसार सन 2022-23 मधील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया 19 मे 2022 रोजी सुरू झाली असून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे पालकांना एसएमएस जाण्यास सुरूवात झाली आहे. मात्र पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर भेट देवून अर्जांची स्थिती तपासणे मळत्वाची आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व पालकांनी नोंद घ्यावी. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून अलॉयमेंट लेटरची प्रिंट काढून विहीत मुदतीत तालुका स्तरावरील कागदपत्रे पडताळणी समिती केंद्रावर जावे. कागदपत्र पडताळणी ही 19 ते 27 मे दरम्यान करण्यात येणार आहे. याच कालावधीत कागदपत्रे पडताळणी होणे अनिवार्य आहे. तरी याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळा, पालक व तालुकास्तरावरील संबंधित यंत्रणांनी नोंद घ्यावी. जास्तीत जास्त बालकांना प्रक्रियेत सहभागी करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किशोर पागोरे यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button