
महापुरुषांचे पथदर्शक नामफलक पुन्हा उभारण्यात यावे – जनहित मंचतर्फे रेणुकादास मुळे यांची मागणी
चिखली : शहरातील जुने गाव परिसरात लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. पंजाबराव देशमुख यांची नावे असलेले पथदर्शक नामफलक अनेक वर्षांपासून नगरपालिकेद्वारे बसवण्यात आले आहेत. मात्र सध्या या नामफलकांची दुरवस्था झाली असून ते मोडकळीस आले आहेत. हे नामफलक त्वरित नव्याने उभारण्यात यावेत अशी मागणी जनहित मंचचे संयोजक रेणुकादास मुळे यांनी नगर पालिका प्रशासनाकडे दि. १४ जून रोजी केली आहे
जुने गाव परिसरात गणेश नगर कमानीला लागून असलेल्या लोकमान्य टिळक मार्ग या नामफलकाची पूर्णपणे दयनीय अवस्था झाली असून तो जमिनदोस्त झलेला आहे. उदासीन महाराज मठासमोरील चौधरी यांच्या घराच्या कोपऱ्यावर पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग असा नामफलक अस्तित्वात होता. आज मात्र तो पूर्णपणे नामशेष झाला आहे. याशिवाय जुना बुलडाणा मार्ग येथे एंडोले यांच्या घरासमोरील कोपऱ्यावर डॉक्टर पंजाबराव देशमुख मार्ग असा नामफलक असून तो देखील मोडकळीस आला आहे. या तीनही नाम फलकांची त्वरित नव्याने उभारणी करण्यात यावी अशी मागणी जनहित मंचचे संयोजक रेणुकादास मुळे यांनी नगरपालिका मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांच्याकडे दि. 14 जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर भिकु लोळगे, सत्य कुटे, अरुण सोनवणे व सतीश बिडकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button