♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कत्तलीसाठी गायी, वासरे नेतांना देऊळगाव साकरशा येथे वाहन पकडले. जानेफळ पोलीसांनी केले गुन्हे दाखल. चार आरोपी अटक एक फरार

MH 28 News Live, जानेफळ : संदीप अर्जुन अल्लाट ( 33 ) यांनी जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी साक्षीदाराला सोबत गाळ टाकण्याचे काम पाहण्यासाठी दिनांक 15 जून रोजी सकाळी शेताकडे गेले असता बोलेरो पिकप वाहन क्रमांक एमएच ३० बिडी २१३२ व एमएच ३० एबी ०६२१ भरधाव वेगाने निष्काळजीपणाने धावताना आढळली. या गाडीतून गोधन नेत असल्याच्या संशय आल्याने, सदर वाहन देऊळगाव साकरशा बस स्टैंडवर थांबवून वाहनांमध्ये पाहणी केली. त्यावेळी वाहनात जनावरे क्रूरपणे डांबून त्यांच्या पायाला दोरी बांधून कैद केलेल्या अवस्थेत दिसली. सदर दोन्ही पिकपमध्ये एकूण 16 गाई, एक जिवंत गोरा, तीन जिवंत वासरे, एक मृत गाय असे एकूण 1 लाख 12 हजार रुपयाचा गोधन एकवीस जनावरे दिसली.

जनावराच्या मालकी बाबत वाहन चालकाला विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली सदर पिकप मध्ये जनावराचे पाय एकमेकाला बंदिस्त असताना चोरुन कत्तलीसाठी वाहतूक करताना मिळून आल्याने जानेफळ पोलीस स्टेशन मध्ये ३७९,४२९,२७९,३४ भादवि सहकलम ११(ह)(घ)(ड)(च) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 कलम ५.५(अ)ब तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 कलम ११९,१२४, मोटार वाहन कायदा कलम १८३,१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी अबीत खान नजीम खान, सय्यद रब्बिल सय्यद साजिक, सय्यद सउद सय्यद इस्लाम उद्दीन राहणार पातुर, प्रकाश मोतीराम जाधव राहणार पांगरा बंदी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम व सय्यद पुरी फरार यांच्यावर जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले असून चार आरोपी अटक करण्यात आली व एक फरार आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवान दत्त, मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावार, यांनी घटनास्थळी धाव घेऊन शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवली. ठाणेदार राहुल गोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सावले अधिक तपास करीत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129