♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जळगाव जामोद पोलिसांची मोठी कारवाई सातारा जिल्ह्यातील आरोपींच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्टल केले जप्त. आरोपी अटकेत

MH 28 News Live, जळगाव जामोद : स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या बुरहानपुर रोडवरील निमखेडी फाट्यानजीक दि. 16 जून रोजी संध्याकाळी पाच वाजेदरम्यान नाकाबंदी करीत असताना जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना एक संशयास्पद लाल रंगाची तवेरा गाडी येताना दिसली. गाडीला थांबवून तिची तपासणी केली असता गाडीमध्ये परशुराम रमेश करवले ( २३ ) रा. सोमवार पेठ कराड जिल्हा सातारा, अभिजीत दिलीप येडगे ( 19 ) रा. अहिल्या नगर मलकापूर तालुका कराड, दिनेश विजय बुरुंगले ( 22 ) रा. सातारा, कुणाल बाबुराव हिवरे ( 23 ) रा. रेहटे तालुका कराड जिल्हा सातारा हे चार आरोपी मिळून आले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्टल व चार मोबाईल यासह तवेरा गाडी एम एच 11 ए एल 9594 असा एकूण सहा लाख पंधराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपासाकरता आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलीस त्यांच्या कस्टडीची मागणी करणार आहेत. याच तपासकामी सातारा जिल्हा एलसीबीचे पथक जळगाव जामोद येथे आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ठाणेदार सुनील अंबुलकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वनारे,पोलीस कॉन्स्टेबल सुनील वावगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे,उमेश शेगोकार, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, इस कॉन्स्टेबल प्रशांत डांमरे यांनी ही कारवाई केलेली आहे. सदर हे आरोपी बुऱ्हाणपूर येथून देशी कट्टे घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये काही कटकारस्थान रचत तर नाही ना ? असा प्रश्न येथील एलसीबी पथकाला पडला असावा त्यामुळेच जळगाव जामोद येथे हे पथक दाखल झाले आहे. जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्हाभरात त्यांच्या या कारवाईची कौतुक होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129