♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हनवतखेड येथे व्यसनमुक्ती अभियानात दारु मुक्त गावाचा संकल्प

MH 28 News Live, धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील डोंगर पायथ्याशी असलेल हनवतखेड वनग्राम आहे. येथिल कुटुंबांचे उदरनिर्वाह दैनंदीन मोलमजुरीवरच निर्भर असुन तोकड्या मजुरीवर पुरुषां सह तरुण व बाल्यावस्थेतील मुले दारुच्या व्यसनाधीन झाल्याने अनेक कुटुंब उध्वस्त होत उघड्यावर आली आहेत. येथिल शेकडो महिलांनी खेडी येथिल माजी बुलडाणा जि. प. उपाध्यक्ष मुक्त्यारसिंग राजपुत यांचे सुपुत्र सुभाषसिंग राजपुत यांना सांगितली असता ” जिथे आहे कमी तिथे आहे आम्ही ” या परंपरागत कार्याने सुभाषसिंग राजपुत यांनी हनवतखेड येथिल तरुणांसह महीलांना एकत्रित जमवुन त्यांना व्यसनमुक्ती बाबत मार्गदर्शन केले. तत्काळ औरंगाबाद येथिल सारा व्यसनमुक्ती संशोधन उपचार केंद्रचे तज्ञ डाॕ. कृष्णा रामचंद्र भावले यांचेशी संपर्क साधुन माहीती दिली.

डाॕ. भावले यांनी व्यसनमुक्त उपचार शिबीर घेण्या विषयी सांगितले या नुसार हनवतखेड येथे सुभाषसिंग राजपुत डाॕ. विवेक राजपुत व SBI चे निवृत्त मॕनेजर भाउसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने व्यसनमुक्ती अभियान यशस्वी झाले. या व्यसनमुक्ती उपचारा दरम्यान २० तरुणांन सह प्रौढ व बाल्यवस्थेतील मुलांनीही सहभाग घेतल्याने ते व्यसमुक्त नशामुक्त झाल्याचा आनंद व कुटुंबात विशेषता शेकडो महीलात उत्साह दिसुन येत आहे. येथिल महीलांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता व्यसनाधीन असतांनाचे दुःख व व्यसनमुक्त झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. असे व्यसनमुक्ती शिबीर प्रत्येक गावा गावात घेतल्यास घरा घरातील महीलांचे संसार सुखी होतील. महीलांचे भावनात्मक विचाराने थक्क झालेले सुभाषसिंग राजपुत यांनी प्रत्येक गाव खेडे व्यसनमुक्त नशामुक्त व आनंदी कुटुंब करण्यासाठी मी गावक-यांच्या सहकार्याने सदैव प्रयत्नशील राहील असा संकल्प व्यक्त केला.

विशेष , हनवतखेड येथिल शेकडो महीलांसह तरुणांचा व्यसनमुक्त व नशामुक्त संकल्प शिबीराचा उत्साह पाहता धा.बढे पो.स्टे चे ठाणेदार चंद्रकांत ममताबादे , बिट अंमलदार शरद बाठे यांनी स्थानिक महीलांना दीलासा देत नशायुक्त पदार्थ, अथवा दारु विक्रेत्या विरुध्द कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129