
कोरोना अलर्ट : प्राप्त 645 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 13 पॉझिटिव्ह
MH 28 News Live, बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 658 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 645 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 13 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपिड चाचणीमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोग शाळेतील 2 तर रॅपिड टेस्टमधील 643 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 645 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मेहकर तालुका : जानेफळ 8 , बुलडाणा तालुका : धाड 1, करडी 1, सोयगाव 1, चिखली तालुका : तेल्हारा 1, चिखली शहर :1 अशाप्रकारे जिल्ह्यात 13 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. तसेच एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 812965 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98330 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98330 आहे. आज रोजी 80 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 812965 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 99037 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98330 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचा उपचार घेत असलेला 19 रूग्ण आहे. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button