दि चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा
MH 28 News Live, चिखली : चिखली शहरातील अग्रगण्य व अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या दि चिखली अर्बन विद्यानिकेतन ( सीबीएसई ) स्कुल मध्ये शाळेचा पहिला दिवस खूप उत्साहात साजरा करण्यात आला.
दि २० जून २०२२ सोमवारी रोजी दि चिखली अर्बन विद्यानिकेतां ही शाळा सुरू झाली. शाळेत येणाऱ्या सर्व विद्याथ्यांचा उत्साह अगदी जोमत होता. नुकतीच उन्हाळी सुट्टी संपली जरी असेल तरी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून दि चिखली अर्बन विद्यानिकेतांच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी अगदी जोमात व उत्साहात केली होती.
विद्यार्थ्यांना अगोदर रानवारा या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली होती व त्यानंतर त्याठिकाणी त्यांचा परिपाठ घेण्यात आला. त्यानंतर त्यांच्याकडून भगवत गीतेतील श्लोक म्हणून घेण्यात आला. त्याचबरोबर सर्व शिक्षकांनी देखील श्लोक म्हणाले. मुलांना त्या श्लोकांचे पूर्ण मराठीमध्ये त्याचा अर्थ सांगण्यात आला. त्यामुळे विध्यार्थ्यांना तो चांगल्या प्रकारे समजला.त्यानंतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर अशी प्रार्थना सादर केली. प्रार्थना झाल्यानंतर विध्यार्थ्यांना शाळेच्या इमारतीकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामध्ये सर्व शिक्षकांनी मुलांचे रानवारा हॉल पासून ते शाळेच्या मुख्य इमारती पर्यंत फुलांनी स्वागत केले. शाळेत पोहचल्यावरही त्यांचं स्वागत एक छानश्या गाण्याने करण्यात आलं.
विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पेक्षाही त्यांचं स्वागत दि चिखली अर्बन विद्यानिकेतां शाळेने उत्साहात व आनंदात केले. या सर्व गोष्टींचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यानंयर शाळेत पोहोचल्यानंतर ही विद्यार्थ्यांसाठी खूप सारे उपक्रम हे समाजासाठी मोलाचा संदेश देणारे होते आणि ते मुलांनी खूप आनंदाने पार पाडले. अशा प्रकारे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांनी आनंदात, उत्साहात व प्रसन्न वातावरणात साजरा केला.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button