डोणगांव राज्य महामार्गोवर अतिक्रमण रहदारीस अडथळा
MH 28 News Live, डोणगाव : डोणगांव हे राज्य महामार्गोवर असणारे गाव असून येथून दररोज शेकडो वाहने जा ये करत असतात. परंंतु, सदर बसस्थानकावर दररोज होत असणारी वाहतुक कोंडी ही वाहनधारकांबरोबर गावकऱ्यांची समस्या बनली आहे.
येथे वाहतुक कोडी होत असल्याने बसस्थानकावरून जाणे मुश्कील होत आहे. डोणगांव येथे राज्य महामार्गोशेजारी बस थांबा आहे परंतु या परीसरात फळ विक्रेते तसेच ग्रामपंचायत हद्दीत असणार्या गाळे धारकांनी रस्त्यालगत अतिक्रमण केल्याने समोरा समोर वाहन आले की वाहतुक कोडी होते. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. एवढेच नव्हे तर तर या अगोदर डोणगांवच्या वाहतुक कोंडीमध्ये माजी मंत्री मनोहर नाईक हे एकदा सापडले असता त्यांनी त्वरीत सदर अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. तेव्हा सदर महामार्गावरील अतिक्रमण काढण्यात येऊन वाहतुक कोंडी कमी झाली होती. मात्र आता राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजुने बसस्थानकाशेजारी अतिक्रमण झाल्याने दुचाकी चालक हे चक्क रस्त्यावर गाडी लावत आहेत. परिणामी राज्य महामार्गालगत वारंवार वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळव स्थानिक ग्रामपंचायतने रस्त्यावर व रस्त्यालगत दुकाने लावणारे व अतिक्रमण करणारे यांच्यावर कारवाई करून वाहतुकीची कोंडी दुर करण्याची मागणी होत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button