कुणाल बोंद्रेसह कुटुंबातील चौघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल. बोगस अकृषक करुन विकलेल्या भुखंडावर उचलले करोडोचे कर्ज.
MH 28 News Live, चिखली : स्थानिक पुंडलिक नगर भागात बोंद्रे परीवाराच्या मालकीची जमीन होती. ह्या जमीनीवर भुखंड पाडुन त्यांनी यापुर्वीच तिची विक्री केली होती. खरेदी खताव्दारे विकलेल्या या भूखंडाचे अकृषक झाल्याचे देखील भासवण्यात आले. भूखंड विकत घेतल्यानंतर काही दिवस त्याची ७/१२ वर नोंद झाली नाही. त्यानंतर खरीददारांपैकी विजय वाळेकर यांनी सातबार्यावर नोंद होण्यासाठी तलाठी कार्यालयात खरेदीखत दिले असता सदर भूखंडावर मुळ मालकाने बँकेचे कर्ज घेतल्याचे निर्दनास आले. मुळ मालकाला याबाबत वारंवार सांगुन देखील त्यांनी याबाबत टाळाटाळ केली. अखेर दि.५ जुलै रोजी वाळेकर यांनी चिखली पोलीसांकडे तक्रार दिली. या तक्रारीवरून कुणाल बोंद्रेसह त्यांच्या कुटुंबातील चौघांवर चिखली पोलीसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या बाबतीत थोडक्यात माहिती अशी आहे की, विजय वाळेकरसह एकुण ५७ लोकांनी तहसिलदारांकडे दोषीवर कारवाई होऊन सातबारा मध्ये नोंद होण्याबाबत निवेदन दिले होते. दि. ३१ डिसेंबर २०१२ रोजी विजय वाळेकर यांच्या आई सौ. ज्योती भगवान वाळेकर यांच्या नावावर असलेल्या चिखली न. पा. सर्व्हे नं. 103 /5 मधील उपविभागीय अधिकारी बुलडाणा याचे फाईल क्रमांक प्र. का. एन ए.पी. ३६ / चिखली /१५९ /२००३ /२००४ दि. २९ /१२ /२००३ नुसार बिगर शेती वापरात केलेली खुली जागा लांबी २८ फुट रुंदी १४ फुट असे एकूण ३९२ चौ. फुट क्षेत्रफळाची जागा शेख अर्शद शेख इसराईल रा. चिखली यांचेकडून खरेदी केली होती. तसेच शेख अरशद शेख इसराईल याने वर नमुद जागा / प्लॉट मारोती गोविंद गोडवे यांचेकडुन घेतला आहे, मारोती गोविंद गोडवे यांनी ही जागा प्रदीप पितांबर वाळेकर रा. चिखली यांचेकडून विकत घेतली आहे. प्रदीप वाळेकर यांनी ही जागा प्रकाश चंपकराव देशमुख यांचेकडून घेतली असुन प्रकाश देशमुख यांनी ही जागा विश्वभरआप्पा मार्तंडआप्पा बोंद्रे यांच्याकडून खरेदी करुन विकत घेतली आहे. सदर प्लॉटची खरेदी करते वेळी उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयीन आदेश रा. प्र. का. एन. ए.पी. 36/ चिखली १५९ /२००३ /२००४ /२९ /१२२००३ नुसार मारोती गोविंदा गोडवे यांचे नावे अकृषक आदेशाची प्रत खरेदीची वेळी जोडण्यात आली होती. मी विकत घेतलेल्या सव्हें नं १०३/५ जागेचे मुळ मालक सुरेश आप्पा विश्वंभर आप्पा बोंद्रे, सुभाषआप्पा विश्वभरआप्पा बोंद्रे, काशिनाथ आप्मा विश्वभर आप्पा बोंद्रे रा. चिखली हे आहेत. रामभाऊ लक्ष्मण खंडारे, गोपाल कळसकर, सतीश गणेश तळेकर यांच्यासह अणेकांनी त्यांचेकडुन प्लॉट खरेदी केलेले असल्यामुळे त्यांचेसुध्दा प्लॉटची सातबारा मध्ये नोंद होत नव्हती. म्हणून सर्वांनी एकत्रित येवून तलाठी व मंडळ अधिकारी यांचेकडे वारंवार नोंदी साठी तलाठी यांना सांगितले.
परंतु तलाठ्यांनी तुम्ही विकत घेतलेली जागेची सातबारा मध्ये नोंद नसून ती जागा एका बँकेकडे जागेचे मुळ मालक सुरेश आप्पा विश्वंभरआप्पा बोंद्रे, सुभाष आप्पा विश्वंभरआप्पा बोंद्रे, काशिनाथ आप्पा विश्वंभर आप्पा बोंद्रे या तिन्ही भावांनी तारण दिलेली असुन सदर जागेवर त्यांनी कर्ज घेतलेले आहे तसे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सांगितले की नमुद प्लॉट हे अकृषक झालेबाबत आदेश नाहीत असे सांगितले.वाळेकर यांनी सदर नागरिकांना घेऊन सुरेशआप्पा विश्वंभरआप्पा बोंद्रे, सुभाष आप्पा विश्वभर आप्पा बोंद्रे, काशिनाथ आप्पा विश्वंभरआप्या बोंद्रे यांच्या वारंवार भेटी घेवून जागा आमच्या नावावर करून देणेबाबत विनंती केली परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस टाळाटाळ केली. विजय वाळेकर यांनी माहीती अधिकाराव्दारे अर्ज करुन उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांचे कार्यालयांत अकृषक आदेशाची प्रत मिळणेबाबत अर्ज केला असता कार्यालयाकडुन नमुद आदेश रेकर्डवर आढळून आला नाही असा रिपोर्ट दिला आहे त्यावरून नमुद सर्व्हे नं १०३ / ५ अकृषक झाले नसल्याचे समजले.
जागेचे मुळ मालक सुरेशआप्पा विश्वंभरआप्पा बोंद्रे, सुभाषआप्पा विश्वभर आप्पा बोंद्रे, काशिनाथ आप्पा विश्वंभरआप्पा बोंद्रे यांनी चिखली येथील सर्व्हे नं. 103/5 मधील प्लट अकृषक असल्याचे सांगुन जास्त पैसे घेवून प्लटची विक्री केलेली आहे. तसेच बँकेस सर्व्हे नं. १०३/५ मधील प्लॉट चे गहाण खत करुन कर्ज घेऊन लोकांची फसवणुक केली आहे. कृणाल सुभाष आप्पा बोंद्रे रा. चिखली खडकपुरा यांनी विक्री करुन देखील त्याच सर्वे १०३/५ दुय्यम निबंधक दस्त क्र १६०० दि.३०/०३/१७ प्रमाणे गहाण खत तयार करून त्यावर दोन करोड रुपये कर्ज उचल केला आहे. विक्री केलेली असताना देखील त्याच जमीनीवर कर्ज घेवुन परस्पर गहाणखत करून देवुन प्लॉटधारकासह बँकेची देखील फसवणुक केली आहे. त्यामुळे हे नावावर होत नाहीत. ज्यांनी सर्वे न १०३/५ मध्ये प्लॉट खरेदी करून दिले त्याची सुरेश आप्पा विश्वंभरआप्पा बोद्रे, सुभाष आप्पा विश्वभरआप्या बोंद्रे, काशिनाथआप्पा विश्वभरआप्पा बोंद्रे व कुणाल सुभाषआप्पा बोंद्रे रा. खडकपुरा चिखली यांनी संगनमत करून खोटे अकृषक आदेश तयार करुन जास्त दाराने मुखंडाची विक्री केली व आमच्याकडुन पैसे घेतल्याची तक्रारीवरून सुभाषआप्पा विश्वभरआप्पा बोद्रे, सुरेशआप्पा विश्वंभरआप्पा बोद्रे , कुणाल सुभाषआप्पा बोंन्द्रे रा. खडकपुरा चिखली यांच्या विरोधात विजय भगवान वाळेकर यांच्या फिर्यादीवरून भा. दं. वि. ४२०, ४२३, ४६५, ४६८, ४७१, ४०६, १२० – बी नुसार गुन्हे दाखल केले असुन पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button