♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखली शहरात उभारणार छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा

MH 28 News Live, चिखली : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा चिखली शहरात असलेल्या पूर्णाकृती पुतळ्या ऐवजी अश्वारूढ पुतळा बसविण्याची शिवभक्तांची आग्रही मागणी लक्षात घेऊन आ. श्वेताताई महाले यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा सूरू केलेला आहे. याबाबत आ. महाले यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे परवानगीचे पत्र सुद्धा दिले आहे. जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी याबाबत पूर्णाकृती पुतळयाऐवजी अश्वारूढ पुतळा उभारण्याची कार्यवाही करण्याकरता पुतळा समितीकडून दिनांक 02 मे, 2017 च्या शासन निर्णयानुसार परिपुर्ण प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्याबाबत सुचवलेले आहे.

चिखली शहरात पूर्णाकृती पुतळयाऐवजी अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे पुतळा समिती कडून आवश्यक त्या परवानग्या आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी पुतळा समिती गठीत करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने चिखली शहरातील सर्व शिवप्रेमींची बैठक आयोजीत करण्यात येणार आहे. बैठकीचे आयोजनाचे नियोजन झाल्याबरोबर सर्व शिवभक्तांना सोशल मीडिया आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यावेळी सर्व शिवप्रेमींनी सदर बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन देखील आ. श्वेताताई महाले यांनी केले आहे.

स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजाचा उभा पूर्णाकृती पुतळा खूप वर्षापूर्वी बसविण्यात आलेला आहे. सदर पुतळा अश्वारूढ असावा अशी शिव भक्तांकडून सातत्याने मागणी होत आहे. चिखली शहरात सर्वांचा स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य असा अश्वारुढ पुतळा बसविण्यासाठी पुतळा समिती गठीत करावी लागणार आहे. पुतळ्या साठी येणारा खर्च हा लोक वर्गणी करून उभारावा लागणार आहे. चौक सौंदर्यीकरण हे काम शासकिय निधीतून करता येईल त्यासाठी लागेल तेव्हढा निधी आ. महाले ऊपलब्ध करून देणार आहेत. परंतु पुतळ्यासाठी लोक वर्गणीच करावी लागणार आहे. त्यासाठी दानशुर व्यक्तींनी समोर येण्याची आवश्यता पडणार आहे .

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129