
सैनिक भवन बांधण्यासाठी निधी मिळवून देणार – आ. श्वेताताई महाले. श्रीराम पतसंस्थेने केला शहिद सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार. क्रांतीदिनी वीर माता पित्यांना वंदन
MH 28 News Live, चिखली : देशाच्या संरक्षणासाठी तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या वीर जवानांबद्दल समाजात कृतज्ञतेची भावना आहे. लष्करी जवानांच्या त्यागाचा सन्मान करण्याच्या जाणीवेतून व निवृत्तीनंतर त्यांचे जीवन अधिक सुखकर व सुलभ व्हावे या उद्देशाने तालुक्यातील माजी सैनिकांसाठी माजी सैनिक भवन बांधण्याकरता निधी देणार असल्याची घोषणा आ. श्वेताताई महाले यांनी केली.
श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दि. ९ आँगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांती दिनाचे औचित्य साधून शहिद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख भाषण करताना त्या बोलत होत्या. जिजाऊ इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बंगाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सतीश गुप्त, अध्यक्ष चिखली अर्बन बँक, अँड. विजय कोठारी, अध्यक्ष अंबिका अर्बन सोसायटी, रामकृष्णदादा शेटे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ, सुरेशअप्पा खबुतरे ज्येष्ठ नेते भाजपा, ज्येष्ठ नेते प्रकाश महाराज जंजाळ, रामदासभाऊ देव्हडे, अँड. मंगेश व्यवहारे अंकुशराव पाटील, शेख अनीस जिल्हाध्यक्ष भाजपा अल्पसंख्यांक आघाडी, सुनीताताई भालेराव, शहराध्यक्ष भाजपा महिला मोर्चा, कृष्णकुमार सपकाळ भाजपा तालुकाध्यक्ष, शिवराज पाटील, भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी राजेश कुळकर्णी व त्रिदल सैनिक सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर सोळंकी यांची उपस्थिती होती.
*मोदी सरकारने वाढवले लष्कराचे मनौधैर्य – आ. श्वेताताई महाले*
आपल्या भाषणात आ. महाले यांनी स्थलसेना, वायुसेना आणि नौसेनेमध्ये कार्यरत असलेल्या जवानांच्या योगदानाबद्दल प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान असून केंद्रातील मोदी सरकारने ‘ वन रँक वन पेंशन ‘ योजना सुरू करून सैनिकांना न्याय दिल्याचे त्या म्हणाल्या. पूर्वी पाकप्रशिक्षित आतंकवाद्यांच्या सततच्या भ्याड हल्ल्यांमुळे आपले जवान शहीद होत असत, त्याचा परिणाम जवानांच्या मनोबलावर व्हायचा. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत पुलवामा हल्ल्यानंतर या हल्ल्यांना शत्रूच्या घरात घुसून आमच्या शूर सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले. गेल्या विस वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या सीमेवर जागता पहारा देणार्या शूर सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात, अश्या वेगवेगळ्या प्रकारे सरकारने जवानांचे मनौधैर्य वाढवल्याचे प्रतिपादन आ. श्रीमती महाले यांनी केले.
*सैनिक भवनासाठी पुढाकार घेणार – आ. श्वेताताई महाले*
डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमांचे प्राणपणाने रक्षण करणारे लढाऊ वृत्तीचे शूर लष्करी जवान ही समाजाची बहुमोल संपत्ती आहे असे प्रतिपादन यावेळी बोलताना आ. श्वेताताई महाले यांनी केले. आजी – माजी सैनिकांसाठी चिखली नगर पालिकेने शहरात भूखंड उपलब्ध करून द्यावा, त्यावर सैनिक भवन उभारण्यासाठी माझ्या आमदार निधीतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडून भरघोस निधी मिळवून देण्याचे आश्वासन आ. श्वेताताई महाले यांनी उपस्थित सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना दिले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पंडीतराव देशमुख यांनी शहिद लष्करी जवानांच्या बलिदानाचा यथोचित सन्मान व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. संस्थेचे संचालक कमलकिशोर लांडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले संस्था या वेळी श्रीराम पतसंस्थेचे संचालक, चिखली शहर व लगतच्या परिसरातील शहिद जवानांचे कुटुंबीय, आजी – माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था व जिजाऊ इंग्लिश मिडीयम स्कुलच्या कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button