चिखली शहरातील प्रधान मंत्री आवास योजनेच्या निधीला मान्यता. आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना यश
MH 28 News Live, मुंबई: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत CSMC मान्यताप्राप्त BLC प्रकल्पांना राज्य शासनाचा अनुज्ञेय निधी महाराष्ट्र निवारा निधीतून वितरित करण्याबाबतच्या महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतल्याने चिखली शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील 44 घरकुलांसाठी आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नाने 44 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याने चिखली शहरातील घरकुल धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत ना. फडणवीस , उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना आ. श्वेताताई महाले यांनी दि. 28 जुलै रोजी निधी मागणीचे पत्र दिले होते. त्यावर उपमुख्यमंत्री यांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश प्रधान सचिव, गृह निर्माण यांना दिले होते. त्याअनुषंगाने राज्य शासनाने 5 ऑगस्ट 2022 रोजी निधी वितरणाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
चिखली नगर परिषद हद्दिमधील जि बुलडाणा येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सादर केलेल्या BLC-४ या घटकांखालील प्रकल्पाला केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीने (CSMC) चिखली नगर परिषद येथे ८ DPR मंजूर झालेले असून सदर मंजूर DPR मध्ये १४३५ घरकुले मंजूर आहेत.
घरकुलांच्या एकूण किमती पैकी राज्य शासनाकडुन १३९१ लक्ष तर केन्द्र शासनाचा ६८१ लक्ष रूपये निधी प्राप्त झालेला आहे. तर राज्य शासनाचा एकूण रु.४४,००,०००/- व केंद्र शासनाचा एकूण रु. १४,७९,५०,०००/- असा एकूण रु.१५.१५,५०,०००/- एवढ्या निधी अप्राप्त आहे.
आता केंद्राच्या निधीसाठी प्रयत्न करणार
चिखली शहरातील पात्र घरकुल धारकांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन घरकुलांचे काम केलेले आहे. शासनाकडुन निधी उपलब्ध न झाल्याने घरकुल धारक आर्थिक अडचणीत आहे. त्यांना घरकुल बांधकामाचे लवकरात लवकर पैसे मिळायला पाहिजे त्यासाठी राज्य सरकारला पत्र दिले होते . त्यामूळे राज्य शासनाचा निधी आहे . आता केंद्र सरकारचा निधी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे निधी मागण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यामूळे लवकरच केंद्र सरकारचा निधी उपलब्ध होऊन चिखली शहरांतील सर्व पात्र घरकूल धारकांना मिळणार असल्याचा विश्वास आ. श्वेताताई महाले पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
चिखली सोबतच राज्यातील 57 नगर पालिकांना मिळाला निधी
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने (CSMC) मंजूर केलेल्या BLC प्रकल्पांना राज्य शासनाचा अनुज्ञेय निधी महाराष्ट्र निवारा निधीतून वितरित करण्याबाबतचे प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते. सदर प्रस्तावांच्या अनुषंगाने राज्यातील एकूण ५७ स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण रुपये १२९.२६ कोटी ( अक्षरी एकशे एकोणतीस कोटी सव्वीस लक्ष फक्त) इतका निधी महाराष्ट्र निवारा निधीतून वितरीत करण्यास यान्वये मंजूरी देण्यात देण्यात आल्याने चिखली नगरपालिका सोबतच राज्यातील 57 नगर पालिकांना घरकुलांचा निधी उपलब्ध झाला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button