क्रीडा भारती मेहकर तर्फे तिरंगा ध्वजाचे वाटप
MH 28 News Live, मेहकर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त भारत सरकारच्या हर घर तिरंगा योजनेस अनुसरून क्रीडा भारती मेहकरच्या वतीने तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमास तिरंगा ध्वजचे वाटप मेहकर शहरातील बालाजी मंदिर परिसर, आठवडी बाजार परिसर, व्यापारी ठिकाने करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मोहन राजदेरकर, क्रीडा भरतीचे शहर अध्यक्ष शैलेश बावणे, जीवन जोशी, प्रवीण जोशी, अमित अवस्थी व क्रीडा भरतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सर्व नागरिकांनी भारत सरकारच्या या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा फडकावा असे आवाहन केले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button