
चिखली – दुसरबीड बसफेरी सुरू करावी – नांदवे यांची मागणी
MH 28 News Live, चिखली : चिखली येथील बसस्थानकाचे आगारप्रमुख, संबंधित अधिकारी यांना अनु जाती मोर्चा, भाजपा, देऊळगाव राजा तालुक्याच्या वतीने चिखली ते दुसरबीड बस सेवा पुर्वी प्रमाणे सुरू करा या बाबतचे निवेदन भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष गजानन नांदवे व अशोक नांदवे दिले.
यावेळी लवकर बस सेवा सुरु करण्यात यावी असी चर्चा केली, चिखली ते दुसरबिड बस सेवेचा लाभ, देऊळगाव मही, खैरव, वाकद, वाघ्रुळ, टाकरखेड वायाळ, निमगाव वायाळ, बारलिंगा, तढेगाव, दुसरबीड येथिल शाळेतील विद्यार्थी,व प्रवासी यांचे आतोनात हाल होत आहेत. यासाठी लवकरच बस सेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले.