♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ विमाशीचे २३ आँगस्टला धरणे, सहभागी होण्याचे जिल्हाध्यक्ष अवचार यांचे आवाहन

MH 28 News Live, चिखली : राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व समस्या सोडविण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने माजी शिक्षक आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या नेत्व्रुत्वाखाली मंगळवार दि. २३ आँगस्ट रोजी विदर्भस्तरीय धरणे आंदोलन आयोजित केले आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना विमाशिसंघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे व सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी नोटीस पाठविली असून त्यामध्ये जुनी पेन्शन योजना सरसकट सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार १००% अनुदान मंजुर करणे, अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीव तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करुन आवश्यक निधीची तरतूद करणे, राज्यातील रिक्त असलेली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची पदे भरण्यास तात्काळ मंजुरी देणे, भविष्य निर्वाह निधी परतावा, ना परतावा मंजुर करण्यासंदर्भाने वारंवार बंद करण्यात येत असलेली टॅब (बिडीएस) नियमित सुरु करुन प्रलंबित देयके मंजूर करणे या व इतर अनेक प्रलंबित मागण्या व समस्या नमूद केल्या आहेत.

मंगळवार २३ आॅगष्ट रोजी दुपारी ३ ते ५ या कालावधीत आयोजित केलेले हे धरणे आंदोलन अमरावती व नागपूर येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (माध्य) कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनात शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन *विमाशिसंघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे, सरकार्यवाह सुधाकर अडबाले, प्रांतीय पदाधिकारी, जिल्हा मार्गदर्शक बाबाराव कडू जिल्हाध्यक्ष विष्णू अवचार जिल्हा कार्यवाह सतीश शेळके व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129