
सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या – दे. माळीचे सरपंच किशोर गाभणे यांची मागणी
MH 28 News Live, मेहकर : मागील जून महिन्यात जवळपास सतत 25 ते 30 दिवस वरून राजाची हजेरी होती. त्यामुळे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी देऊळगाव माळीचे सरपंच किशोर गाभणे यांनी केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी मेहकर तालुक्यात सतत पाऊस पडला. यामध्ये कित्येकांच्या तूर पिकाला फटका बसला. तर काही शेतकऱ्यांची तुर पिक नेस्तनाबूत झाले. सोयाबीन, उडीद, मुग, या पिकांना सुद्धा पावसामुळे हानी पोहोचली. काही शेतकऱ्यांची मुगाचे पीक हाती येऊन गेले. अशा या सततच्या पावसामुळे मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी व परिसरात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग होत आहे. तसेच देऊळगाव माळीचे सरपंच किशोर गाभणे यांनी माननीय तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी अधीक्षक, यांना निवेदन देऊन संबंधित विभागाला पंचनामे करून तसेच सूचना द्याव्या अशा प्रकारची निवेदन सुद्धा दिली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button