♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कोविडमुळे पालक गमावलेल्या ३ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना मिळणार शैक्षणिक खर्चासाठी अर्थसहाय्य

MH 28 News Live, बुलडाणा : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बाल निधीची रक्कम राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय निधीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर रकमेचा विनियोग कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रति बालक कमाल मर्यादा १० हजार रूपये इतकी वापरण्यास जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हाकृती दल यांना मान्यता देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या वयोगट ३ ते १८ मधील बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रति बालक कमाल मर्यादा १० हजार रूपये वितरीत करावयाचा आहे. पात्र लाभार्थ्यांनी अर्जाचा नमुना सबंधित तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अथवा संरक्षण अधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बस स्टँड च्या पाठीमागे, डॉ जोशी नेत्रालय जवळ, मुठठे ले आउट, बुलडाणा यांचे कार्यालयात उपलब्ध करून घ्यावे. मूळ अर्जासह आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव वरील कार्यालयांपैकी एका कार्यालयास जमा करावे.

अधिक माहितीसाठी संर्पक अधिकारी संरक्षण अधिकारी (संस्था अंतर्गत) गजानन कुसुंबे यांच्या 9764008894 मोबाईल क्रमांकासह संपर्क करावा. अर्थसाह्य मिळण्याकरिता अर्जासोबत बालकांचे शाळा बोनाफाईड, आई – वडील मृत्यू प्रमाणपत्र छायांकित प्रत, वडील यांचे कोविड १९ पॉझिटिव्ह असल्याबाबतचा पुराव्याची छायांकित प्रत, बालकाचे आधार कार्डची छायांकित प्रत, तसेच बालक अथवा पालक संयुक्त राष्ट्रीय बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे.

Related Articles

Check Also
Close
Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129