शेगाव – पंढरपूर महामार्ग रस्ता कामात अनियमता. शेतात पाणी घुसल्याने लाखो रुपयांची पीकहानी
MH 28 News Live, लोणार : शेगाव -पंढरपूर पालखी महामार्गाचे काम लोणार मेहकर हद्दीत सन २०१७ पासुन कासव गतीने सुरू आहे .आज २०२२ आले तरीही काम अपूर्ण आहे. या पालखी महामार्गाचे काम १८ महिन्यांमध्ये पूर्ण करावयाचे होते असे समजते. परंतु हे भिजत घोंगडे अजून किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही. या महामार्गाचे काम पूर्ण होणे अगोदरच झालेल्या रस्त्यांला तडे जात आहे.आणी रस्त्याच्या नाल्या उतार (लेव्हल ) व्यवस्थित घेतली नसल्याने दोन वर्षापासून रस्त्याचे पाणी शेतकर्याच्या शेतात जाऊन पिकांचे अतोनात नुकसान होत आहे .तक्रार करूनही या कडे रस्ते विकास महामंडळ दुर्लक्ष करीत आहेत.
लोणार – मेहकर महामार्गावर जागो जागी तडे गेलेले दिसत आहेत. या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता ढसाळलेली आहे. याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. या महामार्गाच्या बाजूला लोकांची शेती आहे. पूर्वी शेती आणि रस्ते समांतर होते. परंतु आता पालखी महामार्गाचे काम सुरू झाले. तेव्हापासून रस्ते हे शेतापासून उंच झाले. नाल्यांचे काम व्यवस्थित झाले नाही. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दोन वर्षापासून पाणी जात असल्यामुळे शेतात तलाव निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पूर्णता पिकाची नासाडी होत आहे. काही ठिकाणी वहिवाटीचे रस्ते बंद झाल्याचे दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी संबंधित विभागाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यांना व ज्या कंपनीने पालखी महामार्गाचे काम करण्यास घेतले. त्यांना शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या नोटीस दिल्या. तरीही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होताना दिसत नाही .शेतकऱ्यांनी रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालय मध्ये जाऊन तोंडी, लेखी, भ्रमणध्वनीवर तक्रारी दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी स्थळ निरीक्षण सुद्धा केले तरीही शेतकऱ्यांच्या शेतामधलं पाणी काढून देण्याचा प्रयत्न या लोकांनी केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे दोन वर्षापासून अतोनात नुकसान होत आहे. कोणाकडे न्याय मागावा हे सुद्धा कळत नाही. संबंधित विभागाचे अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी उडवायडीचे उत्तर देत आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. आम्हाला नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न पिडीत शेतकरी विचारत आहेत.
लोणार नगरी ही एक जगप्रसिद्ध ‘अ’ वर्ग दर्जा पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे . शहराच्या हद्दीत रस्त्याच्या हद्दीपासून नालीपर्यंत पादचार्या साठी अंदाजे ७ ते ८ फुट पयॅत पेवर ब्लॉक बसवण्याचे काम करण्यासाठी खोदून ठेवले. रस्त्याच्या बाजूला खड्डे दिसत आहेत. परंतु अजून पर्यंत त्या कामाला यांनी हात सुद्धा लावला नाही. तेही काम रेंगाळलेले आहे . यामुळे शहरातील व्यवसायिकांना आपल्या दुकानासमोर माती मुरू आणून टाकावा लागला. त्यामुळे पावसाळ्याचे दिवस असल्याने दुकानासमोर चिखल झालेला दिसत. आहे .त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शहर स्वच्छ सुंदर ही संकल्पना धुळीस मिळताना दिसत आहे. शासन विकास कामासाठी निधी ची तरतुद करते परंतु निष्क्रिय अधिकारी आणी कामाची जाणीव नसलेले ठेकेदार यांच्यामुळे शासनावर जनतेचा रोष निर्माण होताना दिसत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button