२०२५ मध्ये असे येणार महत्त्वाचे सण – उत्सव
MH 28 News Live : दोन दिवसांनी सुरू होणारे २०२५ हे वर्ष सणवारांच्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण असेल. या वर्षात काही सण सुमारे १५ दिवस आधीच येणार आहेत. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असे सण समीकरण ठरलेले असते. अश्यातच हिंदू आणि मुस्लिम धर्मियांसाठी महत्त्वाचे असलेले मोहरम आणि आषाढी एकादशीचे पर्व एकाच दिवशी म्हणजे ६ जुलैला येणार आहेत.
नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेनुसार कोणत्या तारखेला कोणते सण येणार याकडे लक्ष लागून राहिलेले असते. विशेष म्हणजे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी असे मोठे सण कोणत्या महिन्यात येतात, हे लोक आवर्जून दिनदर्शिकेत पाहतात. २०२५ च्या नव्या वर्षात सण १० ते १२ दिवस आधीच येत आहेत. यंदा ऑगस्ट महिन्यात गणपतीबाप्पाची आगमन होणार आहे.दरवर्षी सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असे सण समीकरण ठरलेले असते. अधिक महिना असल्याकारणाने सण एक महिना पुढे जातात. यंदा मात्र १ ते १५ दिवस आधीच सर्व सण उत्साहात साजरे होणार आहेत. येत्या वर्षाची सुरुवात मकर संक्रातीने होणार आहे. १४ जानेवारीला मकर संक्रांत आहे. गुढीपाडवाही मार्चमध्येच साजरा होणार आहे.
२०२५ मध्ये आषाढी एकादशी आणि मोहरम (इस्लामी नवीन वर्ष) एकाच दिवशी ६ जुलै रोजी येत आहेत. हे एक असामान्य आणि विशेष योग आहे कारण दोन्ही धार्मिक सण वेगवेगळ्या परंपरांचे पालन करणारे असतात. गुढीपाडवा आणि रमजान ईदही लागोपाठ असून ३० मार्चला गुढीपाडवा तर ३१ मार्चला रमजान ईद साजरी होईल.
२०२५ मध्ये हे कोणत्या या तारखेला आहेत
भोगी (१३ जानेवारी ) सोमवार
मकर संक्रांत ( १४ जानेवारी ) मंगळवार
महाशिवरात्री ( २६ फेब्रुवारी ) बुधूवार
होळी ( १३ मार्च ) गुरुवार
रंगपंचमी (१९ मार्च ) बुधूवार
गुढीपाडवा (३० मार्च ) रविवार
वटपौर्णिमा (१० जून) मंगळवार
कर्नाटकी बेंदूर (१२ जून ) गुरुवार
आषाढी एकादशी ( ६ जुलै ) रविवार
श्रावण महिना प्रारंभ ( २५ जुलै ) शनिवार
नागपंचमी ( २९ जुलै ) मंगळवार
रक्षाबंधन ( ९ ऑगस्ट ) शनिवार
श्रीकृष्ण जन्मष्टमी ( १५ ऑगस्ट ) शुक्रवार
श्री गणेश चतुर्थी ( गणेश आगमन २७ ऑगस्ट ) बुधवार
गौरी आगमन ( ३१ ऑगस्ट ) रविवार
गौरी पूजन (१ सप्टेंबर ) सोमवार
घरगुती गणेश विसर्जन ( २ सप्टेंबर ) मंगळवार
अनंत चतुर्दशी ( ६ सप्टेंबर ) शनिवार
घटस्थापना ( २२ सप्टेंबर ) सोमवार
दसरा ( २ ऑक्टोबर ) गुरुवार
नरक चतुर्दशी ( दीपावली ) (२० ऑक्टोबर) सोमवार
लक्ष्मी पूजन ( २१ ऑक्टोबर ) मंगळवार
दिवाळी पाडवा ( २२ ऑक्टोबर ) गुरुवार
भाऊबीज ( २३ ऑक्टोबर ) गुरुवार
तुळशी विवाह ( २ ऑक्टोबर ) रविवार
दत्त जयंती ( ४ डिसेंबर ) गुरुवार
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button