शिक्षकाला नडली ‘ इझी मनी ‘ ची हाव, विस लाख रुपयांनी झाली ना फसवणूक राव ! सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कौतुकास्पद कारवाई
MH 28 News Live / बुलढाणा : बाजारात भाजी खरेदी करणे, चपलेचा तुटलेला अंगठा शिवून घेणे आदी दैनंदिन किरकोळ व्यवहारात चार – दोन रुपपयासाठी घासघिस करणारे कवडीचुंबक लोक मात्र कमालीचे हावरट असतात याची अनेक उदाहरणे आपण आपल्या आसपास पाहातो. असे लोक सहसा एखाद्या आमिषाला ताबडतोब बळी पडतात. ” अति शहाणा त्याचा बैल रिकामा ” ही म्हण अशा लोभी लोकांमुळे वारंवार खरी ठरते. अशीच एक घटना बुलढाणा येथे उघडकीस आली आहे. झटपट पैसा मिळवण्याच्या नादात एका शिक्षकाने स्वतः ची विस लाख रुपयांनी फसवणूक करून घेतली. परंतु, बुलढाणा पोलीसांच्या सायबर गुन्हे शाखेने आपली कार्यक्षमता पणाला लावून या प्रकरणाचा तपास करत सुरत येथून सदर घटनेतील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत थोडक्यात माहिती अशी आहे की, बुलढाणा येथील एका शिक्षकाची सायबर गुन्हेगारांनी वीस लाखाची ऑनलाइन फसवणूक केली होती.याप्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांनी अविरत परिश्रम घेत संशयित आरोपींना गुजरातच्या सुरत येथून अटक केली आहे. बुलढाणा सायबर पोलिसांनी ही माहिती दिली आहे.फिर्यादी अशोक प्रकाश बुलकुडे (२९, रा. सुंदरखेड, बुलढाणा) यांना चालू वर्षाच्या जानेवारीमध्ये व्हाइट्सअपवर संदेश आला. त्यांना शेअर बाजारमध्ये जास्त नफा देण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून जवळपास वीस लाख रुपये उकळण्यात आले.
इतक्या मोठ्या रकमेची गुंतवणूक करूनही त्याचा परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर फिर्यादी अशोक बुलकुडे यांनी बुलढाणा सायबर ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी बुलढाणा सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले.त्यानुसार एएसआय शकील खान, पोलीस कर्मचारी राजदीप वानखेडे, विकी खरात, राजू आडवे, कुणाल चव्हाण, ऋषिकेश खंडेराव तसेच पंढरी सातपुते यांचे एक पथक स्थापन करण्यात आले. प्राप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात बुलढाणा सायबर पोलिसांना अखेर यश आले. या पथकाने गुन्हेगारचा मागोवा घेत गुजरात राज्यातील सुरत शहर गाठले. या कारवाईत आरोपी सय्यद नवाज सय्यद समद ( वय चौवीस वर्ष) अल्ताफ उर्फ फैजल खान अजीज खान (वय सत्तावीस वर्ष), शेख सुफीयान शेख इम्रान (वय तेवीस वर्ष) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व आरोपी गुजरात राज्यातील सुरत शहरातील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.त्यांना अटक करून बुलढाणा येथे अनन्यात आले. आरोपींना बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती बुलढाणा सायबर पोलिसांनी दिली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button