बंगलोर पासून झारखंड पर्यंत तपास केला; सायबर पोलीसांनी ऑनलाइन फसवणुकीचा पर्दाफाश केला… बुलडाण्यातील महिला पोलीस कर्मचारी भगिनीचे ६४ हजार मिळवले परत
MH 28 News Live / बुलढाणा : मुंबईमध्ये पोलिस दलात कार्यरत असलेल्या बुलढाणा येथील महिला पोलिस कर्मचार्याची एपीके फाईल डाऊनलोड करून ६४ हजार ६१८ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल होती. या प्रकरणात बारकाईने तपास करत बुलढाणा सायबर पोलिस स्टेशनच्या कर्मचार्यांनी महिल पोलिस कर्मचार्याची रक्कम ३० डिसेंबर रोजी परत मिळवून दिली.
आम्रपाली अवसरमोल यांची जानेवारी २०२४ मध्ये फसवणूक झाल होती. याप्रकरणी त्यांनी बुलढाण सायबर पोलिसात तक्रार केली होती त्यावरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला होता. य प्रकरणात सायबर पोलिसांच्य तपासात असरमोल यांची ही रक्कम बंगळुरू येथील एका बँकेच्या बनावट खात्यात गेल्याचे निदर्शनास आले. खाते झारखंडमधील एका व्यक्तीचे होते. त्याचाही मागमूस लागत नव्हता प्रकरणी लगोलग झालेला व्यवहार ह बँकेशी संपर्क करून होल्ड करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात बैंक व्यवस्थापकाशी संपर्क साधण्यात येऊन प्रकरणाची गंभिरता निदर्शनास आणून देम्यात आली. शेवट न्यायालयाच्या आदेशानंतर ३१ डिसेंब रोजी ही रक्कम महिला पोलिस कर्मचार्यास रिफंड करण्यात आली. य प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शिपीष खंडारे, पोलिस हवालदान रामेश्वर मुंढे, भारत जंगले, केशव घुबे पोलिस नायक राजदीप वानखेडे यांच्य पथकाने केला. किचकट तांत्रिक विश्लेषण करत ही रक्कम परत मिळवण्यात आली.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button