विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उद्या जिल्ह्यात
MH 28 News Live, बुलडाणा : महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शुक्रवारी, दि. 16 सप्टेंबर 2022 जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दानवे यांचे दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होऊन अभ्यगतांशी भेटी घेतील. दुपारी 12.15 वाजता गर्जे हॉल येथील शिवसेना मेळाव्यास उपस्थित राहतील. दुपारी 2.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्यासमवेत जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करतील. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता जाईचा देव ता. भोकरदन, जि. जालना कडे प्रयाण करतील.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button