♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गावकऱ्याच्या सतर्कतेने अट्रॅक्सीटी प्रकरणातील दोन फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

MH 28 News Live, डोणगाव : गावकऱ्याच्या सतर्कतेमुळे अट्रॅक्सीटी प्रकरणामधील फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. नागपूर येथील नागरिकांनी गावात संशयस्पद उभे असणार्‍या ना पकडले व ते दोन्ही अट्रॅसिटी मधील फरार आरोपी निघाले.

डोणगाव डोणगाव पासून तीन किमी अंतरावर असणाऱ्या ग्राम नागापूर येथे 16 सप्टेंबरच्या दुपारी दोन वाजता दरम्यान दोन युवक संशयस्पद उभे दिसून आले संशयस्पद फिरणाऱ्या दोन युवकांना नागापुर येथील गावकऱ्यांनी पकडून डोणगाव पोलिसांच्या स्वाधीन केले त्यांना पाहताच पोलिसांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. मागील एक महिन्यापासून अट्रॅसिटी मधील फरार आरोपी पोलिसांना अलगद मिळून आले डोणगाव येथील एका अट्रॅसिटीमधील चार आरोपी हे मागील महिन्याच्या 20 तारखे पासून फरार होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते मात्र हे मिळून आले नाहीत. अश्यातच 16 सप्टेंबरच्या दुपारी 2 वाजता दरम्यान दोन युवक नागापूर येथे संशयस्पद दिसून आले. यावर ग्रामस्थांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. अश्यात गावकऱ्यांनी त्यांना पकडले असता ते दारु पिलेले सुद्धा मिळून आले. गावकऱ्यांनी दोघांना पकडले व डोणगाव पोलिसांना माहिती दिली असता डोणगांव पोलीस स्टेशनला एका वाहनाला कट मारुन एक गाडी मेहकरकडे गेल्याची माहिती मिळाली होती. अशातच नागापूर येथुनही फोन आल्याने ठाणेदार निलेश अपसुंदे यांनी ताबडतोब पो काँ गजानन ठाकरे व गोविंद खंडागळे ह्यांना नागापूरला पाठविले. त्यांनी दोन्ही युवकांना पकडले व पाहीले असता सदर आरोपी हे मागील एक महिन्या पासून फरार आहेत हे स्पष्ट झाले. डोणगाव पोलीस अजय ठाकूर, राहुल देशमुख यांचा शोध घेत होते, मात्र ते सापडले नाही अश्यातच हे दोन्ही आरोपी नागापूर येथील गावकऱ्याच्या सतर्कतेणे अलगद पोलिसांच्या तावडीत सापडले.. दोन्ही आरोपीना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129