ढगफुटी सदृश्य पाऊस, देऊळगाव माळी परिसरात लोकांनी रात्र काढली जागून
- MH 28 News Live, मेहकर : देऊळगाव माळी व परिसरात 18 सप्टेंबर च्या सायंकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. नाल्यांना नदीचे स्वरूप आले. ढगांच्या गड गडाचा सह अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस अर्धा ते तास भर धो-धो बरसला. या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात पिकांचे, व मातीच्या घरांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची संभाव्य शक्यता आहे.
काहींच्या घरामध्ये सुद्धा पाणी घुसले. त्यामुळे रात्री झोपावे कुठे असा प्रश्न ज्यांच्या घरात पावसाची पाणी घुसले त्यांना पडला होता. परंतु कशीबशी रात्र पाण्यातच त्यांनी घालवली. रात्री पाऊस आल्यामुळे नेमके कुठे आणि किती प्रमाणात नुकसान झाले याची नोंद वृत्तलीहेपर्यंत मिळाले नाही. परंतु या पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुसकान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पाऊस असा बरसत होता की, आतापर्यंतच्या पावसाळ्यामध्ये अशा स्वरूपाचा पाऊस अजूनही बघायला मिळाला नाही. या पावसाला नेमकी कोणती उपमा द्यावी हेच कळेनाशे झाले. नेमके कोणाचे काय नुकसान झाले हे सूर्यनारायणाचे दर्शन झाल्यानंतरच कळेल.वृत्त लीहेपर्यंत सुद्धा अतिशय मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळत होता.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button