♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

थरारक घटना – शिवसेना तालुका प्रमुख निंबाजी पांडव यांना भर रस्त्यात दाखवली तलवार

  1. MH 28 News Live, डोणगांव : शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुलडाणा जिल्ह्यात शिवसेना पदाधिकार्यांच्या नवीन नियुक्त्या जाहीर केले त्यामध्ये मेहकर पंचायत समितीचे माजी सभापती निंबाजी पांडव यांची मेहकर तालुका शिवसेना प्रमुख पदी नियुक्ती जाहीर केली. पांडव हे मेहकर वरुन आपल्या गावी डोणगाव येथे येत असताना डोणगांव पोलीस स्टेशन च्या हद्दीत नागापुर जवळ दि. 20 सप्टेंबर ला संध्याकाळी 9.15 वाजताच्या दरम्यान अज्ञात मोटरसायकल स्वाराने निंबाजी पांडव यांच्या मोटरसायकलला कट मारला, त्यामुळे निंबाजी पांडव यांनी आपल्या मोटरसायकलचा वेग कमी केला असता समोरील मोटरसायकल स्वाराने चक्क चालू मोटरसायकलवर तलवार काढून निंबाजी पांडव यांना फिरकावुन दाखवत मोटर तो डोणगांवच्या दिशेने निघून गेला. पांडव यांनी डोणगांवचे ठाणेदार निलेश अपसूंदे यांना मोबाईलवरुन त्वरीत हा प्रकार सांगितला. परंतु, बंदोबस्त लावी पर्यंत तो मोटरसायकल स्वार गायब झाला.

या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, मेहकर शिवसेना शहर प्रमुख किशोर गारोळे व इतर शिवसैनिक डोणगाव दाखल झाले व डोणगाव पोलीस स्टेशनला तक्रार देऊन चर्चा केली. शिवसेना तालुका प्रमुख यांना तलवार का दाखविली व ते पळून जाणारे कोण याबाबत तालुक्यात चर्चा रंगली असुन पोलीसांनी अशी घटना पुन्हा घडु नये म्हणून त्वरीत सदर अज्ञात व्यक्तींचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129