♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

संकटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने आर्थिक मदत द्यावी – शेतकरी संघटनेचे चिखलीत निवेदन

MH 28 News Live, चिखली : यावर्षी चिखली तालुक्यात अतीवृष्टीमुळे आणि रायझोक्टोनीया एरियल ब्लाईट रोगामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यातच लंपी रोगाने शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना आस्मानी आपत्तीचा सामना करण्यासाठी व त्यांच्या सबलीकरणासाठी सरकारने त्वरित आर्थिक मदत करावी.अशी मागणी चिखली तालुका शेतकरी संघटना युवा आघाडीने निवेदनाद्वारे तहसीलदार चिखली यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सदर निवेदन शेतकरी संघटना युवा आघाडी च्या नेतृत्वाखाली तहसीलदाराला देण्यात आले आहे सदर निवेदनात म्हटल्या नुसार वर्षी जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे आणि रायझोक्टोनीया एरियल ब्लाईट रोगामुळे सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान पाहता शेतकरी या आसमानी संकटामुळे हवालदील झाला आहे. मोठ्या आशेने शेतकरी पिक विमा भरतो परंतु पिकाचे प्रत्यक्ष नुकसान होऊन सुद्धा विमा कंपन्या अनेक निकषांचे तकलादू निष्कर्ष लावून पिक विमा देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहतो. त्यामुळे पिक विमा पद्धती ही शेतकऱ्यांसाठी आंधळा जुगारच ठरत असल्याचा अनुभव आहे. सन ऑगस्ट २०२२ पासुन आजपर्यंत शेतकरी अतिवृष्टी मारा सहन करीत आहे त्यामुळे सोयाबीन, उडीद, मुंग, तुर ,कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची जनावरे लंपी आजाराने दगावली आहे त्या शेतकऱ्यांना १ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी.त्वरित पंचनामे करावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. सदर मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाभर तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, एकनाथ पाटील, समाधान कणखर, भागवत घुबे,संदीप थुट्टे, गजानन घुबे,दिपक बाहेकर, ज्ञानेश्वर घुबे,सचिन गव्हते, मनोज थुट्टे,राजू शेटे,विठ्ठल थुट्टे,समाधान घुबे,भानुदास घुबे,ऋषी भोपळे,शशिकांत मिसाळ,प्रकाश घुबे,योगेश वाघमारे, समाधान पैठणे,अमनुल्ला खाँसाहाब, लिबांजी घुबे,शेषराव शेळके,धोंडू पाटील, अक्षय सुरुशे, अमोल घुबे, पांडुरंग घुबे, आकाश जाधव, सुभाष बांडे, लिंबाजी सुरुशे, भिका सोळंकी, विठ्ठल सोळंकी, नितेश घुबे, तुळशीदास बळप, देविदास भगत,दत्तात्रय कणखर, पुंजाजी घुबे, कृष्णा शेटे, समाधान गाडेकर, उध्दव पाटील, ज्ञानेश्वर सोळंकी, ज्ञानेश्वर वरपे, संतोष भुतेकर, तानाजी चिकने इत्यादी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129