♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, देऊळगाव माळी येथील घटना

  1. MH 28 News Live, मेहकर : तालुक्यातील देऊळगाव माळी येथे कौटुंबिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. मयत विवाहितेस ८ महिन्यांची मुलगी असून सदर प्रकरणी

सविस्तर वृत्त असे की, राधिका पवन खेत्री या 22 वर्षीय विवाहित महिलेने कौटुंबिक छळाला कंटाळून 30 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने समाजमन अगदी सुन्न झाले असून त्यापेक्षाही लोकांचे मन गहिवरून आले ते 8 महिन्याच्या गौरी या चिमुकलीकडे बघून. राधिकाचे लग्न मागील दीड वर्षांपूर्वी देऊळगाव माळी येथील पवन विश्वनाथ खेत्रे या युवकासोबत समाजाच्या चालीरीतीप्रमाणे झाले होते. त्यांना आता सध्या आठ महिन्याची गौरी नावाची मुलगी आहे. कौटुंबिक छळाला कंटाळून राधिकाने आपल्या बाळासोबतच तिने माहेरकडील लोकांना पोरंक केल आहे. या घटनेने देऊळगाव माळी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार दुपारी दोन वाजता गळफास घेऊन राधिकाने आपली जीवन यात्रा संपवली. तिला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. राधिका खेत्रे यांची माहेरकडील मंडळी चांदूरबाजार जिल्हा अमरावती यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब मेहकर पोलीस स्टेशन गाठून आक्रोश करत पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पुढील विधी करणार नाही ही ठाम भूमिका माहेरकडील नातेवाईकांनी घेतली होती. सौ. रेखा संजय पवार व राधिकाचे नातेवाईक यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार निर्मला परदेशी यांनी गुन्हा दाखल केला. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारी नुसार राधिका खेत्रे यांना आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती- पवन विश्वनाथ खेत्रे, दीर- नितीन विश्वनाथ खेत्रे, सासू- कमल विश्वनाथ खेत्रे, सासरे- विश्वनाथ उत्तम खेत्रे, जाऊ-वर्षा नितीन खेत्रे, यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 306, 498 अ, 34 नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. माहेरकडील मंडळींनी दिलेल्या तक्रारीनुसार असे नमूद करण्यात आले आहे की, राधिकेचा वेळोवेळी पैशासाठी छळ सासरकडील मंडळी करत होते आम्ही या अगोदर दोन वेळेस बैठकी सुद्धा घेतल्या. पवन खेत्रे यांचे बाहेर संबंध असल्याने तो सुद्धा पतीला त्रास द्यायचा व वेळोवेळी पैशाची मागणी करायचा. आम्ही त्यांना पैसे सुद्धा अनेक वेळा दिले. आज ना उद्या परिस्थिती बदलेल म्हणून आम्ही राधिकेला समजावून सांगत असू अशा प्रकारची तक्रार नातेवाईकांनी मेहकर पोलीस स्टेशनला दिली आहे.
गळफास घेऊन मृत्यूमुखी पडलेल्या राधिका खेत्रे यांच्यावर अतिशय तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी चांदूरबाजार जिल्हा अमरावती येथील शेकडो नातेवाईक अंत्यसंस्काराला उपस्थित होते. तसेच यावेळी मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निर्मला परदेशी, पीएसआय घुले, एपीआय अमर नागरे व इतर पोलीस कर्मचारी असल्यामुळे शांततेत अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेचा पुढील तपास मेहकर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमर नागरे व त्यांचे सहकारी करीत आहे.

आईची आर्त आरोळी
माझ्या राधिकेला न्याय द्या!
माझ्या मुलीने त्यांच्या सासरकडील लोकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळूनच जगाला सोडून गेली. अशा या दृष्ट लोकांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन माझ्या राधिकेला न्याय द्या.
सौ. पवार (मयत राधिकाची आई)

घडलेली घटना ही अतिशय वाईट असून, नेमकी आत्महत्या केली की हत्या केली या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तीर्णच आहे. अशा प्रकारचा सूर ऐकायला मिळत आहे.

” आम्ही घडलेल्या घटनेचा तपास करीत असून कोणतेही कोणत्याही महिलेने टोकाचे पाऊल न उचलता पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार करावी. त्या विवाहितेला आम्ही न्याय मिळवून देऊ ”
– निर्मला परदेशी ठाणेदार मेहकर पोलीस स्टेशन

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129