
आपण यांना पाहिलेत का ?
MH 28 News Live, खामगाव : पाणीपुरी विकून आपला चरितार्थ चालवणारे खामगावलगतच्या वाडी येथील सोपान उगले (४५) हे मागील ३ दिवसांपासून बेपत्ता आहेत. यासंदर्भात खामगाव पोलीसांकडे तक्रार नोंदवली असून सदर व्यक्तीस कोणी पाहिल्यास अवश्य कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दि. १ आँक्टोबर रोजी अचानक बेपत्ता झालेल्या सोपान उगले यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून आले नाहीत. अखेर त्यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. बातमीत प्रकाशित करण्यात आलेला फोटो सोपान उगले यांचाच असून ते कुठे दिसून आल्यास 9764795998 व 9881850546 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.