♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनासाठी अर्ज दाखल करा

MH 28 News Live, बुलडाणा : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून ओबीसी विद्यार्थ्याकरिता देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाख, तर परदेशातील शिक्षणासाठी 20 लाख रुपये मर्यादेत कर्ज सुविधा राष्ट्रीयकृत बँकामार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेमध्ये उमेदवाराला बँकेमध्ये भरलेल्या व्याजाच्या 12 टक्के पर्यंत व्याज परतावा मिळणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेसाठी उमेदवाराचे वय हे 17 ते 30 वर्ष असावे, महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचा पुरावा, ओबीसी असल्याचा जातीचा दाखला, तहसिलदार यांचे 8 लाख रुपयापर्यतचा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दाखला किंवा नॉन क्रीमेलेअरच्या मर्यादेत, बारावीमध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. उमेदवार व पालक यांचे आधार कार्ड, फोटो, आधारकार्ड बचतखाते पासबुकला लिंक असावे. वयाचा पुरावा, शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत आवश्यक कागदपत्रे तसेच शैक्षणिक खर्चाचा तपशिलासह महामंडळाच्या msobcfdc.org या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

राज्य-देशांतर्गत तसेच परदेशी अभ्यासक्रमामध्ये येणाऱ्या अभ्यासक्रमात आरोग्य विज्ञानमध्ये सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम. अभियांत्रिकीमध्ये सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम. व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रमात कृषि, अन्न प्रक्रिया व पशू विज्ञान, दुग्ध विज्ञानमधील सर्व संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश राहणार आहे.

व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी हा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत बँकेने वितरित केलेल्या कर्ज रक्कमेवरील व्याजाची नियमित परतफेड केलेल्या उमेदवाराला केवळ व्याजाचा परतावा उमेदवाराच्या आधार लिंक बँक खात्यात महामंडळ वर्ग करेल. कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त 5 वर्षे राहणार आहे.

पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळ मजला, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलढाणा, दूरध्वनी क्र. 07262-248285. यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129