
26/11 च्या हल्यात शहिद जवानांना 75 नागरिकांनी रक्तदान करून वाहिली श्रद्धांजली. हिंदूराज प्रतिष्ठानचा उपक्रम
MH 28 News Live, अमडापूर : 26/11/2022
स्थानिक हिंदुराज प्रतिष्ठाणच्या वतीने मुंबई येथील 26/11 च्या अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे याच अतिरेक्यांना चोख प्रति उत्तर देण्यासाठी जवांनी आपल्या जीवाची परवा न करता आपल्या प्राणाचे बलिदान दिले. दरवर्षी प्रमाने यावर्षी सुद्धा शहिद जवांंनाना अमडापूर येथे भव्य रक्तदान शिबिर घेऊन
श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली.
कोरोनाचा दोन वर्षेाचा कालखंड सोडला तर मागील ८ वर्षापासून सलग हा कार्यक्रम हिंदुराज प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केल्या जातो. या वर्षी रक्तदान शिबिर घेऊन 75 नागरिकांनी रक्तदान केले. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा यांच्या टिम सहभागी झाली होती. यावेळी मोठ्या संख्येने युवक व नागरिक उपस्थित होते.