थोरल्या भावाची आभाळ माया, धाकटयाला भेट दिली वडीलांची मेनाची काया
MH 28 News Live : चिखली : कोरोना महामारीत कोरोनाची लागन होवुन मरण पावलेल्या वडीलांचा मेनापासुन तयार केलेला हुबेहुब पुतळा थोरल्या भावानाने धाकटया भावाला त्याच्या वाढदिवसी भेट दिला. भावाने दिलेली ही हद्यस्पर्षी भेट सध्या चिखलीत सामाजिक स्थरावर चर्चेचा विषय ठरत आहेे. वडीलांच्या आकस्मिक निधनामुळे धाकटया भावावर विरहातुन मानसीक आघात झाला. या परिस्थीतीतुन त्याला बाहेर काढण्याकरीता कुटूंबियांनी शर्थीचे प्रयत्न केले, अखेर त्याच्या वाढदिवसा निमित्त दिवंगत वडीलांचा हुबेहुब दिसणारा मेनाचा पुतळा पाहुन धाकटयाने ेअश्रुंना वाट मोकळी करून दिली.
चिखली परीसरात स्व. दिपक विष्णू विनकर यांचा मेनाचा पुतळा शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. नजिकच्या पळसखेड दौलत येथील स्व. भास्करराव शिंगणे विद्यालयात स्व. दिपक विष्णू विनकर हे शिक्षक म्हणुन कार्यरत होते. कोरोना काळात स्व. विनकर त्यांचा कोरोनाची लागण झाल्याने उपचारादरम्यान मुत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाउ, आई असा आप्त परीवार आहे. थोरला मुलगा शुभम वय 18 डि.एड.चे शिक्षण घेत असुन धाकटा सुमित हा 14 वर्षाचा असुन 8 वीत शिकत आहे. वडीलांच्या निधनाचा आघात सुमित हा सहन करू शकला नाही, त्यामुळे तो स्वतःची मानसिकता खालावुन बसला आहे, त्याच्या स्वभावात चिडचिड तर कधी एकटक पाहत शांत बसणे कुटूंबियांना त्रासदायक ठरत होते. या परिस्थीतीतुन त्याला बाहेर काढण्यासाठी धोरला भाऊ शुभम, आई व मामा नीलेश आराख यांनी अथक प्रयत्न केले. अखेरीस कुटूंबियांच्या चर्चेतुन सुमितला त्याच्या वाढदिवसानिमित्त आगळी वेगळी वस्तु भेट देण्याचे ठरले.
जयपुर राजस्थान येथील शर्मा यांनी तयार करून दिलेला दिवंगत दिपक विनकर यांचा हुबेहुब दिसणारा मेनाचा पुतळा 30 नोव्हेंबर रोजी सुमित या धाकटया भावाला धोरला भाउ शुभम याने भेट दिला. थोरल्या भावाची आभाळ माया, धाकटयाला भेट दिली वडीलांची मेनाची काया, ही चर्चा गजानन नगरासह संपुर्ण चिखली शहरात होत आहे. याप्रसंगी हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा अँड.सौ. वृषालीताई बोंद्रे, डॉ. प-हाड, शेषराव सावळे पाटील, कुणाल बोंद्रे, श्रीमती प्रमिलाताई जाधव, संगिताताई गाडेकर, शालीनीताई वानखेडे मुख्याध्यापक लाटे सर, मेजर षिनगारे, मिसाळ सर, बोर्डे, कासारे, गायकवाड सर, राजु लहाने, किषोर ठोंबरे, पाखरे, विजय इंगळे, शषिकांत डोंगरदिवे, बाळु कस्तुरे, देवानंद गवई आदिंची उपस्थिती होती.
मानवी जिवनामध्ये आई वडीलांचे अनन्य महत्व असुन आंधळया आई वडीलांना खांदयावर घेवून तिर्थाटन करणा-या श्रावणबाळाची पौराणीक कथा सर्वश्रृत आहे. सुमिधला मिळालेल्या हया अनोख्या भेटीमुळे वडीलांची कमतरता भरून तर निघणार नाही, परंतु भौतीक जगात वडील नसल्याचे दुःख ही त्याला होणार नाही. वडील आपल्या आजुबाजु असल्याची नेहमीच सुमिध ला प्रचिती येत राहील. बंधुत्वप्रेम कसे असावे याचे ज्वलंत उदाहरण शुभम व सुमिध या दोन भावांच्या प्रेमातुन प्रगट होत असल्याचे प्रतिपादन हिकरणी महिला अर्बनच्या अध्यक्षा अँड. वृषालीताई बोंद्रे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button