♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ढगफुटीची शिकार झालेले अंबाशी गाव काढले विकायला. मदतीपासून वंचित असल्याने गावकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा

MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील अंबाशी गावातील ग्रामस्थांनी सरकारच लक्ष वेधून घेण्यासाठी चक्क संपूर्ण गावचं विक्रिला काढलं आहे. विषेश म्हणजे या गोष्टीला ग्रामपंचायतीनेही ठराव करुन पाठिंबा दिला आहे.

अंबाशी ग्रामस्थांनी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारवरचं “अंबाशी गाव विकणे आहे ” चा फलक लावून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. गावकऱ्यांच्या दाव्यानुसार, मागील दीड वर्षापूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे चिखली तालुक्यातील आंबाशी आणि आमखेड येथील दोन्ही धरण फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान झालं होतं. तेव्हापासून नुकसानग्रस्त शेतकरी शासनाकडे धरण दुरुस्ती आणि नुकसानभरपाईची मागणी करत आहेत. मात्र शासन अद्यापही याकडे दुर्लक्ष करत आहे. ढगफुटीमुळे पाझर तलाव फुटून शेतकऱ्यांच्या जमीन खरडून गेल्या, पंचनामे झाले, मात्र, अद्यापही ना नुकसानभरपाई मिळाली ना तलावाची दुरुस्ती झाली, ना शेतकऱ्यांवरील संकट दूर झाले, असेही इथले गावकरी सांगत आहेत. दरम्यान, ग्रामस्थांनी घेतलेल्या या भूमिकेला ग्रामपंचायतीनेही पाठिंबा दिला आहे. २९ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीने यासंदर्भातील ठराव मंजूर केला आहे.

काय म्हटलं आहे ठरावामध्ये ?

२९ रोजी सकाळी ११ वाजता ग्रा.पं. कार्यालयाची मासिक सभा सरपंच कुसुम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. दि. २८ जून २०२१ रोजी अंबाशी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडून धरण फुटून शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वारंवार शासनास व प्रशासनास प्रत्यक्ष सांगुन, निवेदने देऊन, आतापर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची मदत झालेली नाही. त्यामुळे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपले अंबाशी गावं विकणे आहे. करीता हा उपक्रम राबविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी पुर्ववत करण्यासाठी व धरणाची भिंत दुरुस्त करण्यासाठी हा उपक्रम राबवावा असे सभेत ठरले व हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला.
– कुसुम गायकवाड, सरपंच,अंबाशी

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129