
स्वाभिमान सप्ताह निमित्त वृध्दाश्रमास किराणा वाटप. राष्टवादी काॅग्रेस पार्टिच्या ज्यौतीताई खेडेकर यांचा त्सुत्य उपक्रम
MH 28 News Live, चिखली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त तुकाराम वृध्दाश्रम भोकर येथे दि. १२ डिसेंबर रोजी किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा तथा जि.प. सदस्या डॉ. ज्योती खेडेकर यांच्यावतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चिखली विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील, प्रमुख उपस्थीतीत शहर अध्यक्ष रवींद्र तोडकर, शहर कार्याध्यक्ष रहीम पठाण, प्रशांत एकडे, डाॅ सुशांत तांगडे, गणेश धुंदळे, अमोल खेडेकर, विठ्ठल मापारी तर विषेश उपस्थीतीत देशमुख मावशी, रत्नाताई सोळंके, महिला शहर अध्यक्षा बानुताई जैवाळ या होत्या.
खासदार शरद पवार यांचा वाढदिवस हा राज्यासह संपुर्ण देशात स्वाभीमान सप्ताह म्हणुन साजरा करण्यात येतो. या सप्ताहात पक्ष मजबुतीसह विविध समाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणुन ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली व्दारा संचालीत तुकाराम वृध्दाश्रम भोकर येथे वृध्दांची देखभाल सह विविध समाजहिताचे कार्य प्रशंसनिय सुरु आहे. जसे वर्ग पहीली ते दहावी पर्यंत मोफत शिकवणी वर्ग तसेच विविध सामाजिक कार्य येथे सुरु आहे त्या अनुशंगाने राष्टवादी पक्षाकडुन वृध्दांच्या सेवेकरीता खारीचा वाटा म्हणुन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते किराणा सामान वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक वृध्दाश्रमाच्या रुपाली डोंगरदिवे यांनी, सूत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रियंका वानखडे यांनी मानले. यावेळी सुदर्शन कर्हाडे, मोहन देवकर, दिलीप इंगळे, रीतेश डोंगरदिवे, विलास डोंगरदिवे, संकेत डोंगरदिवे, आदित्य डोंगरदिवे, निलेश डोंगरदिवे, आकाश सरोदे, कांताबाई डोंगरदिवे, कावेराबाई डोंगरदिवे, पुजाताई डोंगरदिवे, संगीताबाई पवार यांच्या सह वृध्दाश्रमातिल वयोवृध्द व ईतर उपस्थित होते.