
ॲड. मंगेश व्यवहारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. बाळासाहेब देवरस शाळेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन
MH 28 News Live, चिखली शहरातील सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य व नामांकित पतसंस्था असलेल्या बालाजी अर्बन को – आँप सोसायटीचे अध्यक्ष ॲड मंगेश व्यवहारे यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे शाळेच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यवहारे यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बालाजी अर्बनतर्फे उपाध्यक्ष सत्यनारायण लढ्ढा, संचालक मंडळ व बालाजी बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठानतर्फे संस्थेचे सचिव तथा राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष सुदर्शन भालेराव व सर्व शिक्षक वृंद संस्थेचे जेष्ठ संचालक नारायणराव खरात व सर्व संचालक मंडळ ,चिखली अर्बन बँकेतर्फे संचालिका सुनीताताई भालेराव व तज्ञ संचालक राजेश व्यवहारे, रेणुका माता संस्थान चिखली यांच्यातर्फे उपाध्यक्ष गोपाल शेटे, विदर्भ नागरी तर्फे भास्करराव डुकरे, जनता ग्राहक भांडार तर्फे नंदाताई लढ्ढा, गणपती संस्थान जुने गावचे अध्यक्ष दीपक महाजन व विश्वस्त मंडळ आदी विविध संस्थेच्या मान्यवरांनी सर्वप्रथम सत्कार केला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शहरातील प्रतिष्ठित व्यापारी महेश महाजन यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 150 स्कूल बॅग शाळेस सप्रेम भेट दिल्या. महाजन यांच्या मातोश्री कुंदाताई महाजन व पत्नी वैशालीताई महाजन यांच्या शुभहस्ते मुख्याध्यापक शिवाजी पारवे यांनी त्या स्वीकारल्या. यावेळी संस्थेकडून सुद्धा कुंदाताई महाजन व वैशाली ताई महाजन यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
बालाजी अर्बनचे उपाध्यक्ष सत्यनारायण लढ्ढा, अर्बनचे संचालक तथा राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष सुदर्शन भालेराव, विदर्भ नागरी चे भास्करराव डुकरे, कुंदाताई महाजन,वैशाली महाजन, मोनिका व्यवहारे,मोहित व्यवहारे यांनी मनोगत व्यक्त करून अँड. मंगेश व्यवहारे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे कर्मचारी सुनील शिंदे यांनी आपले वडील जगन्नाथ रामचंद्र शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 501 रुपये व नाथ पुरस्कार प्रदान करण्याचे घोषित केले. सत्कारमूर्ती ॲड. मंगेश व्यवहारे यांनी सुद्धा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे आभार मानले व यापुढे सुद्धा आपल्या पाठीमागे आशीर्वाद रुपी पाठबळ कायम ठेवावे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नारायणराव भवर, धनंजय व्यवहारे, प्रताप खरात, आनंद जाधव, जुलालसिंग परिहार, संध्याताई सावजी, श्रीमती पुष्पाताई राजपूत, अनिल सावजी, गिरीश सावजी, स्वप्निल महाजन, डॉ. संदीप गनोजेकर, ॲड.राधिका गनोजेकर,ॲड.विजय सरदार, माजी सभापती न. प.सुदर्शन खरात,आरिफ भाई, तुपकर सर, शिरीष सावजी, राजेंद्र पडूळकर, शार्दुल व्यवहारे, मोहित व्यवहारे, मुख्याध्यापक शिवाजी पारवे, अलकाताई व्यवहारे, सुनिता भालेराव, मनीषाताई सावजी, लक्ष्मीताई भवर, अनिता देशमुख, छाया गाडे, श्वेता सावजी, अपूर्वा व्यवहारे, ममता खरात यांचे सह बालाजी अर्बनचे सरव्यवस्थापक अनिल गाडे, रमेश बापू देशमुख,अशोक नाईक,अतुल शास्त्री व बालाजी अर्बनचे सर्व कर्मचारी वृंद तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
या कार्यक्रमाचे संचालन पी पी देशमुख यांनी केले.