
जपानी भाषेचे विद्यार्थी नोकरीसाठी जपानला रवाना
MH 28 News Live, चिखली : लक्ष्मी प्रल्हाद वेलफेर फाउंडेशन चिखली द्वारा संचालित जपानी भाषा प्रशिक्षण केंद्र चिखलीचे दोन विद्यार्थी नोकरीसाठी जपानला रवाना झाले. त्यापूर्वी चिखली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
लक्ष्मी प्रल्हाद वेलफेर फाउंडेशन चिखली द्वारा सन डिसेंबर 2018 पासून भवर हार्डवेअर समोर जाफराबाद रोड चिखली येथे जपानी भाषेचे प्रशिक्षण सुरू आहेत. जपानी भाषा शिकल्यानंतर जपानमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळते. संस्थेच्या 22 विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थ्यांची जपानमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहेत. त्यामध्ये आकाश पंडीतकर, गोपाल सपकाळ, समाधान शेजुळ, अमोल जाधव व रितेश अवचार यांचा समावेश आहे. यापैकी आकाश पंडीतकर व गोपाल सपकाळ हे दिनांक 21 डिसेंबर रोजी दिल्लीवरून सकाळी 9 वाजता जपानसाठी रवाना होत असून समाधान शेजुळ अमोल जाधव व रितेश अवचार हे फेब्रुवारी 2023 मध्ये जपानला नोकरीसाठी रवाना होत आहेत. दि. 17 डिसेंबर रोजी आमदार श्वेताताई महाले व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेला नेहमीच सहकार्य करणारे व वेळोवेळी मार्गदर्शन करणारे राजेंद्र व्यास अध्यक्ष व्यास कॅन्सर ट्रस्ट चिखली यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी संस्थाध्यक्ष अँड सी पी इंगळे, गजानन जाधव, प्रा. प्रदीप जाधव, शिक्षक शुभम विनकर व इतरांनी सहकार्य केले. चिखली परिसरातून या विद्यार्थ्यांचे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.