♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोणार तालुक्यात सरपंच पदासाठी नवयुवकांना संधी कही खुशी कभी गम

MH 28 News Live, लोणार : तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंच्यातींसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये पहुर येथील सरपंचांसह सर्व सदस्य अविरोध निवडून आले तर वेणी येथे एका वार्डातील एका जागेसाठी लढत होती. वझर आघाव येथे सरपंच पदाचे नामांकन अर्ज न आल्याने ते पद रिक्त राहले असून सुलतानपूर, वडगाव तेजन, शारा, टिटवी, चिंचोली सांगळे, दाभा, वढव येथे सर्वात जास्त चुरशीची लढत होणार म्हणून तालुक्याचे संपूर्ण लक्ष या कडे लागले होते.

आज तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सकाळी १० वाजे पासून सुरवात झाली. यामध्ये सरपंच पदाचे निकाल समोर आले. सुल्तानपूर येथे किरण हेमराज लाहोटी ह्या सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी निवडून आल्या, वडगाव तेजन येथे विजय काशीराम तेजनकर सर्वसाधारण या जागेवर निवडून आले, धानोरा ग्रामपंचायतसाठी रामचंद्र दत्तात्रय पडघाण ना.मा.प्र साठी निवडून आले तर भानापूर येसापूर गट ग्रामपंचायत साठी निर्मला श्रीराम बोबडे ह्या सर्वसाधारण स्त्री साठी निवडून आल्या.

शिवणी पिसा येथे अनुराधा समाधान पिसे सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी निवडून आल्या, कारेगाव ग्रामपंचायतीसाठी नर्मदा विश्वनाथ केंधळे ह्या सर्व साधारण स्त्री या जागेवर निवडून आल्या. महारचिकना येथे शिवाजी पंढरी ढाकणे हे सर्वसाधारण जागेवर निवडून आले, ब्राह्मण चिकना या ग्रामपंचायतीमध्ये वर्षा रामप्रसाद फडके सर्वसाधारण जागेवर निवडून आल्या तर मांडवा या ग्रामपंचायतीत लक्ष्मी राजू कुहिरे ह्या सर्वसाधारण स्त्री या जागेवर निवडून आल्या. चिखला ग्रामपंचायतमध्ये गणेश भास्कर काकड सर्वसाधारण जागेवर विजयी झाले. पळसखेड ग्रामपंचायतमध्ये पूनम राहुल मानवतकर ह्या अनुसूचित जाती या जागेवर निवडून आल्या, आरडव या ग्रामपंचायतीमध्ये नीता गजानन सरकटे ह्या ना म प्र या जागेसाठी निवडून आल्या तर दाभा ग्रामपंचायतीत मारोती किसन मोरे हे ना म प्र या जागेसाठी निवडून आले आहेत. जांभूळ ग्रामपंचायतीमध्ये झयानेश्वर राजाराम जारे हे ना म प्र या जागेवर निवडून आले असून रायगाव ग्रामपंचायतीत नंदा रामराव नागरे ह्या ना मा प्र स्त्री जागेवर विजयी झाल्या. धाड ग्रामपंचायतीत विलास गोविंदा मोरे हे अनु जाती जमाती या जागेसाठी विजयी झाले असून टिटवी या ग्रामपंचायतीत अनुसया प्रतापराव नरवाडे ह्या अनु जाती स्त्री या जागेसाठी विजयी झाल्या आहेत. गंधारी ग्रामपंचायतीमध्ये वैशाली गजानन लांडगे ह्या अ जाती स्त्री या जागेसाठी विजयी झाल्या तर गुंजखेड येथे प्रल्हादराव तोताराम सुल्ताने हे सर्वसाधारण जागेवर विजयी झाले आहेत. नांद्रा ग्रामपंचायतीत छाया उत्तमराव सानप ना मा प्र स्त्री या जागेवर विजयी झाल्या असून चोर पांग्रा ग्रामपंचायतीत सावित्री शिवलाल राठोड ह्या सर्व साधारण स्त्री जागेवर विजयी झाल्या आहेत.

वढव येथे मीनाक्षी विजय सोनुने ह्या सर्वसाधारण स्त्री जागेसाठी विजयी झाल्या असून पिंपळनेर ग्रामपंचायतीमध्ये कमल अरुण मुंडे ह्या ना म प्र स्त्री या जागेसाठी निवडून आल्या आहेत. गायखेड ग्रामपंचायतीत शालीकराम रतन घायाळ हे ना म प्र या जागेवर निवडून आले असून खुरमपूर ग्रामपंचायत साठी शिवशंकर पांडुरंग भाग्यवंत हे अ जाती जागेसाठी विजयी झाले. सावरगाव तेली ग्रामपंचायतीत जगाराव रामसिंग आडे हे सर्वसाधारण जागेसाठी निवडून आले तर भूमराळा ग्रामपंचायतीमध्ये संतोष प्रल्हाद मोरे ना म प्र या जागेवर विजयी झाले. तांबोळा येथे संजय धोंडू राठोड हे सर्वसाधारण जागेवर निवडून आले असून सरस्वती ग्रामपंचायतमध्ये ज्ञानेश्वर भीमराव कडाळे हे सर्वसाधारण या जागेसाठी विजयी झाले. सावरगाव मुंडे ग्रामपंचायतीत शारदा संदीप इंगोले ह्या अ जाती स्त्री या जागेवर निवडून आल्या असून बाबूलखेड ग्रामपंचायतीमध्ये संगीता आबाराव हाडे ह्या ना म प्र या जागेसाठी विजयी झाल्या. शारा ग्रामपंचायतीमध्ये ज्योती भागवत डव्हळे ह्या सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी विजयी झाल्या असून मोतखेड ग्रामपंचायतीमध्ये समाधान देवराव साठे अ जाती हे निवडून आले. येवती ग्रामपंचायतीत प्रयाग अर्जुन पाटोळे ह्या अ जाती या जागेसाठी विजयी झाल्या तर चिंचोली सांगळे येथे सुनीता विलास घुगे ह्या सर्वसाधारण स्त्री या जागेवर विजयी झाल्या आहेत. अजीसपुर ग्रामपंचायतसाठी गणेश विश्वनाथ मुकीर हे सर्वसाधारण या जागेवर विजयी झाले.

तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सैफन नदाफ व यांच्या सहकार्यांनी मतदान व मतमोजणी प्रक्रिया चोखपणे बजावली. यावेळी लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद आहेर यांनी पोलीस बंदोबस्त चोखपणे राखला होता.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129