
स्वच्छतेच्या अभियानाद्वारे गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी
MH 28 News Live, लोणार : भगवान बाबा कला व वाणिज्य महाविद्यालय, लोणार राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने दि. 20 डिसेंबर रोजी स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त महाविद्यालय परिसराची स्वच्छता आणि प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
प्रथम राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. नंतर गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. आर. एन. बोरसे यांनी प्रथम संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी गाडगेबाबांच्या विचारावर चालणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले. या प्रसंगी सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. संत गाडगेबाबांचे आवडते भजन “गोपाला गोपाला” घेण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सूर्यकांत गीत्ते यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. विठ्ठल भानुसे यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button