♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अन्न व औषध प्रशासनाला आली अचानक जाग, उद्दिष्टपूर्तीसाठी एकाच दिवशी बुलडाण्यातील ३९ पानटपरीधारकांवर तंबाखू नियंत्रण पथकाची कारवाई

MH 28 News Live, बुलडाणा : दररोज उघडपणे रस्त्यावर आणि गल्लीबोळात गुटखा, पान मसाला आदी तंबाखूजन्य पदार्थ विकले जात असताना तिकडे सहेतुक दुर्लक्ष करणारे अन्न व औषध प्रशासन आज अचानक खडबडून जागे झाले. शहरातील 39 पानटपरीधारकावर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने आज, दि. 22 डिसेंबर 2022 रोजी कारवाई केली. यात त्यांच्याकडून 7 हजार 800 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरातील मुख्य परिसर, बसस्थानक, संगम चौक, जयस्तंभ चौक, कारंजा चौक, इकबाल चौक, भोंडे सरकार चौक, तहसील चौक आदी परिसरात ३९ पानटपरीधारकावर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने, जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय अधिनियम 2003 नुसार ही कार्यवाही करण्यात आली.

सदर कारवाई जिल्हा अंबलबजावणी पथकांर्तगत अन्न व औषध सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रामविजय राजपूत, शिपाई ओमप्रकाश साळवे, श्री. लेकुरवाडे, प्रवीण पडोळ, जगदेव टेकाळे, संजय तागवे, दिगांबर कपाटे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समुपदेशक श्री. सरकटे सामाजिक कार्यकर्ता अर्चना आराख यांच्या चमूने ही कारवाई केली.

एरवी होत असलेली शासकीय आदेशाची पायमल्ली जाणीवपूर्वक दुर्लक्षित करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने आज दाखवलेली ही सतर्कता शहरात मात्र चर्चेचा विषय बनली. वरिष्ठांकडून बुलढाणा कार्यालयाला देण्यात आलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली काय ? असा प्रश्न बुलढाणेकर विचारत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129