♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

स्वाभिमानी’चे सरनाईक व राजपूत यांच्या दणक्याने विम्याचे चार कोटि कमी मिळाल्याचा तफावत अहवाल शासनास सादर. लेखी अश्वासनानंतर कृषी विभागातील आंदोलन स्थगीत

MH 28 News Live,चिखली :
तालुक्यातील शेतक-यांनी अँग्रीकल्चर इन्सुरन्स विमा कंपनीच्या माध्यामातुन पिकांचा विमा काढला आहे.पिक नुकसानी पोटी विमा मंजुर झाल्यानंतर मात्र,अनेक शेतक-यांच्या बॅक खात्यावर क्रुट थट्टा करणारी रक्कम जमा झाली.याबाबत शेतक-यांच्या लेखी तक्रारी असुन सुद्धा कसलीही दखल प्रशासनाकडुन घेतली जात नसल्याने दि१९डीसेंबर रोजी स्वाभिमानी चे नेते विनायक सरनाईक,नितिन राजपुत यांनी शेतक-यांसह आक्रमक पावित्रा घेतला होता.दरम्याण या आंदोलनाची दखल घेण्यात आली असुन १६ हजार ६९२ शेतक-यांना मिळालेल्या रकमेत ४ कोटी ३७ लाख २० हजार ८२१ रुपयांची तफावत दिसुन येत असल्याचा स्पष्ट अहवाल कृषी विभागाने तयार केला असुन तो अहवाल विमा कंपनी व शासनास सादर करण्यात आला आहे.दरम्याण तालुक्यातील तृटीतील १२०६ शेतक-यांना या आंदोलनामुळे न्याय मिळणार असुन इतर मागण्यांचे सुद्धा लेखी अश्वासन दिल्याने आठ तासानंतर स्वाभिमानी चे आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.

अतिवृष्टी व सततच्या पावसाने सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान झाले.उभ्या पिकास कोंब फुटले.तर नदिकाठच्या शेती व पिके होत्याची नव्हती झाली.रविकांत तुपकरांच्या सह्याद्री वरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीनंतर रक्कम मंजुर झाली.परंतु कंपनीने शेतक-यांच्या खात्यावर तोकडी रक्कम जमा केली.काही शेतक-यांच्या खात्यात प्रिमीयम पेक्षा कमी रक्कम मिळाली.अजुनही शेतकरी विम्यापासुन वंचीत असल्याने हजारो लेखी तक्रारी शेतक-यांनी दिल्या परंतु त्यावर निर्णय झाला नसल्याने तक्रार निरसन करण्यासाठी राज्य,जिल्हा व तालुका स्तरीय समिती असते;परंतु शेतक-यांच्या तक्रारी असतांना आढावा बैठक घेतली नसल्याने प्रशासन या प्रश्नी गंभीर नसल्याचा आरोप सरनाईक यांनी केला होता.दरम्याण पिक विम्यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी १९/१२/२०२२
रोजी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक,नितिन राजपुत यांच्यासह शेतक-यांनी कृषी कार्यालयाचा ताबा घेत विमा कंपनीच्या मनमानी विरोधात ठिय्या आंदोलन सुरु केले होते.

या आंदोलनाची दखल घेण्यात आली असुन तालुका स्तरीय समितीचे अध्यक्ष तथा तहसिलदार यांनी तातडीने शेतक-यांच्या पिक विमा संदर्भातील तक्रारीच्या अनुषंघाने तालुका तक्रार निवारण समितीची आढावा बैठक घेतली असुन याबाबतचा अहवाल जिल्हा स्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे तुटपुंजी रक्कम मिळालेल्या १६६९२ शेतक-यांच्या मिळालेल्या रकमेत ४ कोटी ३७ हजार ८२१ रुपयांची तफावत असल्याचा स्पष्ट अहवाल शेतकरी निहाय तयार करण्यात आला असुन त्याबबतचा प्रस्ताव शासनास व कंपनीस सादर करण्यात आला आहे.तर स्थानिक नैसर्गीक आपत्ती अंतर्गत पिक विमा रक्कम न मिळालेल्या शेतक-यांची विमा रक्कम दोन आठवड्यात खात्यावर जमा करण्यात येणार आहे, तर काढणी पश्चात नुकसान झालेल्या शेतक-यांची विमा रक्कम केंद्र व राज्य शासनाकडुन प्राप्त होताच खात्यावर जमा करण्यात येणार आहे.यासह इतर मागण्यांचे सुद्धा लेखी अश्वासन तालुका कृषी अधिकारी श्री शिंदे व विमा कंपनीकडुन देण्यात आल्याने तब्बल आठ तासानंतर रात्री उशीरा हे आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.

मागण्यांची पुर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांनी दिला आहे. यावेळी आंदोलनात भारत खंडागळे,अनिल चौहाण,सुधाकर तायडे,रुषीकेश वाघमारे,रामेश्वर चिकणे,औचितराव वाघमारे,विलास वसु,दत्ता मोरे,गजानन कुटे,अशोक गाडेकर,गोकुळसिंग पवार,सतिष ठेंग,प्रल्हाद देव्हडे,नंदकिशोर सरनाईक,भारत गाढवे,संतोष शेळके,ज्ञानेश्वर आंभोरे,रमेश पवार,प्रमोद पवार,कैलास शेळके,पवन डुकरे, अविनाश झगरे, सुदर्शन वाघमारे, बाळासाहेब झगरे,गणेश ठेंग,श्रावण बडगे,अरुण पन्हाळकर,मधुकर चव्हाण,गणेश देशमुख,विठ्ठल परीहार,यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थीत होते.तर कसलाही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

त्रुटीतील १२०६ शेतक-यांना मिळाला न्याय

अनेक शेतक-यांचे पोर्टलवर खाते क्रमांक,आय एफ एस सी कोड चुकल्याने ते शेतकरी विम्यापासुन वंचीत राहले होते. दरम्याण ती त्रुटीची यादी सुद्धा कंपनीकडुन मागवण्यात आली असुन तालुका कृषी अधिकारी शिंदे यांनी कृषी सहाय्यकांना त्याबाबतचे आदेश दिले असुन १२०६ शेतक-यांच्या खात्यावर ७९ लाख ९६ हजार ९२३ रु विमा रक्कम जमा होणार असल्याने त्रुटीतील शेतक-यांना न्याय मिळाला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129