
दे. माळी येथे बारावी परीक्षाचे केंद्र द्या ! पालकांचा आंदोलनाचा इशारा, प्राचार्यांना दिले निवेदन
MH 28 News Live, मेहकर : तालुक्यातील देऊळगाव माळी येथे इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय देऊळगाव माळी येथील प्राचार्यांना आज सादर केले.
आपल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले की इयत्ता बारावीच्या होणाऱ्या मार्च 23 च्या परीक्षेमध्ये येथील विद्यार्थ्यांना वडगाव माळी हे अत्यंत आववळणाचे ,रस्ता व वाहतुकीच्या सुविधा नसलेले मुलींच्या दृष्टीने सुरक्षिततेचा बाबतीत अत्यंत घातक असलेले येथे परीक्षा केंद्र असल्याचे पालकांना समजले. यावेळी पालकांनी आवर्जून उपस्थित राहून प्राचार्यांना निवेद दिले व देऊळगाव माळी येथील 204 विद्यार्थी संख्या असताना केवळ 30 -32 तिस बत्तीस विद्यार्थ्यांच्या भरोशावर वडगाव माळी या आड वळणाच्या गावी परीक्षा केंद्र कसे काय दिले जाऊ शकते व ते आपण मान्य केले कसे असा जाब विचारला. आपण ताबडतोब परीक्षा मंडळाकडे तुमच्या माध्यमातून मागणी करून या ठिकाणी परीक्षा केंद्र मिळवावे. कमी विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या ठिकाणी परीक्षा केंद्र देणे हे तारखी दृष्ट्या बुद्धीला न पटणारी आहे एवढ्या मोठ्या विद्यार्थी संख्या सोबतच देऊळगाव माळी येथे असणारी वाहनांची सुविधा सर्व मनुष्यबळ बहुतेक सोयी असूनही आपल्याला परीक्षा केंद्र न हे दुर्दैव आहे. केवळ 32 पोरांच्या सोयीसाठी एवढ्या मोठ्या शेकडो विद्यार्थी व पालकांना होणारा त्रास अनाठही आहे याबाबतीत परीक्षा मंडळाने दखल घेऊन परीक्षा केंद्र दे. माळी येथे द्यावे अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी प्राचार्यांना पर्यायाने परीक्षा मंडळाला निवेदन देऊन देण्यात आला.
याबाबत प्राचार्यांना विचारले असता रीतसर नवीन केंद्राची अर्ज मागणी, प्रक्रिया व सर्व कागदपत्र व सर्व नियम अटीसह पुर्ण केल्याचे सांगितले. शेवटी अखेरचा निर्णय हा बोर्डाचा असल्याची त्यांनी नमूद केले .