♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ब्रेकींग न्यूज – चिखली पोलिसांनी केली १० लाखाच्या गुटख्याची होळी. तालुका न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार झाली कारवाई

MH 28 News Live, चिखली : न्यायदंडाधिकारी चिखली यांच्या आदेशान्वये व चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान एपिआय प्रवीण तळी, एएसआय शशिकांत धारकरी साहेब व पो. कॉ विनोद ब्राम्हणे यांनी हमाल कामगार यांच्या साह्याने व टाटा मैजिक एमएच २८ एबी ४२८४ व एम एच २१ एक्स ४३९४ या वाहनांतून सितार, वाह, राजनिवास, विमल, बाजीराव मस्तानी, नजर, रोकडा आदी प्रकारचा जप्त केलेला प्रतिबंधित गुटखा किंमत दहा लाख रुपये असा ऐवज आज नगर परिषदेच्या डंम्पिंग ग्राउंड येथे आणून पूर्णपणे जाळून नाश केला.

वर्ष २०२१- २२ मध्ये जवळपास ३० गुन्हे दाखल केले होते. आणि यामध्ये जवळपास १० लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा चिखली पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता. सदर गुटखा हा पोलीस विभागाच्या चिखली येथील मालखाण्यात ठेवण्यात आले होते. सदर गुटख्यामुळे दुर्गंधी पसरु नये म्हणून पोलीस निरीक्षक अशोक लांडे, ठाणेदार चिखली यांनी न्यायदंडाधिकारी चिखली यांना पत्र व्यवहार करून जप्त केलेला गुटखा नाश करण्याची परवानगी मांगीतले असता मा. न्यायदंडाधिकारी चिखली यांनी हा गुटखा नाश करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार आज दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर – औरंगाबाद हायवेवर स्थित नागर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडवर संध्याकाळी पाच वाजेदरम्यान प्रतिबंधित गुटखा आणून संपूर्ण जाळून त्याची राख करण्यात आली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129