
मालगणीच्या गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा
MH 28 News Live, चिखली : येथून जवळच असलेल्या ग्राम मालगणी येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन समाजोपयोगी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे कार्य केले. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा, ग्रामपंचायत मालगणी व युथ वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडिया,बुलढाणा यांच्या सहकार्याने वनराई बंधारा गावातील नदीवरील पुलाजवळ करण्यात आला.
दि. २३ डिसेंबर रोजी यासंदर्भात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालगणी ग्रा.पं.चे सरपंच प्रकाश नारायण चिंचोले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, जलसंधारण अधिकारी श्रध्दा मानकर, जागृती चौधरी, मंडळ कृषी अधिकारी धनेश मकोते, कृषी सहाय्यक व्ही.ए. चिंचोले हे होते. लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, युथवेलचे संचालक राजेश शेळके, ग्रामसेवक अंकुश बोराडे पोलिस पाटिल कैलास कड, सामाजिक कार्यकर्ते रुपेश चिेचोले, छगन खरात, प्रदिप वाकोडे, इंजिनिअर गजानन लाटे रुपेश खरात यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button