
श्वेताताईंकडे विद्याधर महाले यांच्यासारखी हॉट लाईन असल्याने त्यांच्याकडून करुन कामे करून घ्या – पंजाबराव डख नवनिर्वाचीत सरपंच व ग्राम पंचायत सदस्य सत्कार
MH 28 News Live, चिखली : श्वेताताई महाले या कर्तव्यदक्ष आमदार तर आहेतच सोबतच विकासाचा ध्यास घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाचे भाग्य असे की त्यांचे सौ श्वेता ताई महाले यांचे पती हे उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव असल्याने त्यांना कामे करणे सोपे झालेले आहे. त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेने विशेषत: लोकप्रतिनिधी आणि आता नवनिर्वाचित सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांनी आ. श्वेताताई महाले यांच्या जवळ विद्याधर महाले यांच्या सारखी हॉट लाइन असल्याने त्यांच्याकडून आपापल्या गावातील विकास कामांसाठी आग्रह धरून गावांचा विकास करण्याचे काम करण्याचे आवाहन प्रसिद्ध हवामान शास्त्र अभ्यासक पंजाबराव यांनी केले. आ. श्वेताताई महाले यांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
चिखली मतदारसंघातील व बुलढाणा आणि चिखली तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहे त्यांच्या सत्कार दि. २४ डिसेंबर रोजी श्री. शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
गावांच्या विकासाची संधी मिळाल्याने संधीचे सोने करा – आ. श्वेताताई महाले
गावातील जनतेने आपणास गावाच्या विकासासाठी निवडून दिलेले आहे. गावाच्या गरजेनुसार गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय ठेवून आपण गावाच्या विकासासाठी झटत राहिले पाहिजे. आपल्या जन्म आणि कर्म भूमीचे ऋण फेडण्याची उत्तम संधी जनतेने आपणास दिलेली आहे. आपले कार्यकर्तृत्व आणि कोणताही पक्ष, जात , धर्म असा अभिनिवेश न बाळगता आपण विकासात्मक वाटचालीतून आपल्या गावाला उत्तुंग शिखरावर नेण्याचे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी या प्रसंगी बोलताना केले.
जलजीवन मिशन मधुन होणारे काम चांगल्या प्रकारे करुन घ्यावे – विद्याधर महाले
निवडून आलेल्या सदस्यांपैकी महिला सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक महिलेच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावाला शुद्ध नळाचे पाणी मिळण्याचा ध्यास ठेवलेला आहे. आ. श्वेताताई महाले यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जनजीवन मिशन अंतर्गत योजना मंजूर झालेल्या आहे. सदर योजनेतील कामे अतिशय चांगल्या दर्जाची व्हावी यासाठी महिला सदस्यांनी जातीने लक्ष जेणेकरून प्रत्येक माय बहिणीच्या डोक्यावर हंडा उतरवण्याचे कामात आपला सुद्धा खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन विद्याधर महाले यांनी यावेळी केले. ज्याप्रमाणे प्रत्येक घराला शुद्ध शुद्ध पाणी देण्याची नियोजन आ. महाले यांनी केले त्याचप्रमाणे प्रत्येक शेताला रस्ता हे ध्येय सुद्धा त्यांनी ठेवलेले आहे. येत्या काही दिवसातच आ. श्वेताताई महाले यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताची वाट दुरुस्त करून देऊन समृद्धीची नवीन पहाट त्यांच्या माध्यमातून उगवणार असल्याचे प्रतिपादन देखील यावेळी विद्याधर महाले यांनी यावेळी केले.